Breaking News

नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा

युवा नेते दिवाकर निकुरे यांची मागणी – आकापुर येथील शेतकरी महिलेचा घेतला होता बळी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-ब्रह्मपुरी वन विभागाच्या तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या गंगासागर हेटी बिट. कक्ष क्र.2 मध्ये आकापूर येथील एका शेतकरी महिलेचा स्वतःच्या शेतात काम करीत असताना ठार करणाऱ्या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा. अशी मागणी चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवा काँग्रेस नेते दिवाकर निकुरे यांनी केली आहे.

तळोधी (बा.)वन परीक्षेत्राअंतर्गत वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या एकापाठोपाठ तीन घटना घडलेल्या आहेत. मंगळवारी चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील ईश्वर कुंभारे, बुधवारी नागभीड तालुक्यातील आकापूरयेथील दुर्गा चनफने तर शनिवारी पुन्हा चिमूर तालुक्यातील डोमा येथील डोमळू सोनवाने या गुराख्याला वाघाने ठार केले आहे.

सलग एकापाठोपाठ वाघाच्या हल्ल्यात मनुष्याचा बळी जात असताना वन विभाग या बाबिकडे गांभीर्याने बघत नसल्यामुळे जनतेत असंतोष पसरला आहे.सद्यस्थितीत ग्रामीण भागात खरीप हंगामाचे काम वेगाने सुरू आहेत.रोवणीचा हंगाम तर भरात आला आहे.अशावेळी शेतकऱ्यांनी वाघाच्या भीतीने घरी बसून राहायचे.की शेती करायची? हा गंभीर प्रश्न आवासून उभा आहे. याबाबतीत वन विभागाने विशेष दखल घ्यायला हवी. वारंवार शेतकऱ्यांशी चर्चा करून उपाययोजना,मार्गदर्शन व्हायला हवे.मात्र तसे न घडता मनुष्याची जीव हानी घडत आहे. बुधवारी आकापूर येथील दुर्गा चनफने या होतकरू शेतकरी महिलेला वाघाने ठार केले.तेव्हा तिच्या कुटुंबावर काय दुःख कोसळले असेल.

ह्याची कल्पना करणे अवघड आहे.शिवाय आकापूर मार्गाने तळोधीला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. तळोधी बाजार पेठेत येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.तेव्हा पुन्हा अनुचित घटना घडू नये. म्हणून वन विभागाने तातडीने या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा.अशी मागणी चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवा काँग्रेस नेते दिवाकर निकुरे यांनी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’ भेटायला येत आहे

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता …

छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे तख्त दिल्लीचे अन लक्ष्य महाराष्ट्राचे स्वप्न साकार – राहुल मेश्राम

भिलेवाडा येथे संस्कार शिबिरात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- हिंदवी स्वराज्य स्थापनेतुन महाराष्ट्रासह संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved