Breaking News

शेतातील बॅटऱ्या चोरणाऱ्यांच्या वडकी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडकी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी – दोन आरोपीस अटक

तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव

राळेगाव:-राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशनचे हद्दीतील एकुर्ली या गावच्या शेतकऱ्याच्या शेतातून झटका बॅटऱ्या चोरी गेल्या होत्या त्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या दोन चोरांच्या वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय महाले यांचे मार्गदर्शनात वडकी पोलिसांनी मुसक्या आवळून त्यांच्याकडून १३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऐकुर्ली येथून ६ जुलै रोजी वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शेतामध्ये झटका बॅटरीचा उपयोग केला जातो त्या दोन झटका बॅटऱ्या चोरी गेल्याची वडकी पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी गुन्हा नोंद करून वडकी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विजय महाले यांच्या मार्गदर्शनात वडकी पोलिसांनी तपास सुरू केला.

तपास चक्र सुरू असताना चोरटे विहिरगाव येथील असल्याची माहिती मिळतात माहितीच्या आधारे पोलिसांनी विहीरगाव येथील सुभाष वाघु खंगारे (२७), दिवाकर कवडू मेश्राम (२७) या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपीकडून १३ हजारांच्या दोन झटका बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे. अधिक तपास वडकी पोलीस करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

14 मे पर्यंत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी

नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने …

बालविवाह होत असल्यास त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन

पालकांसह इतरांनाही शिक्षेची तरतूद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 संपूर्ण राज्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved