Breaking News

वडकी ठाणेदाराने पकडला जनावर तस्करीचा कंटेनर

धडक कार्यवाहीत ३४ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे

राळेगाव:-वडकी पोलीस स्टेशनचे दक्ष ठाणेदार विजय महाले यांना दि. १०/०८/२०२३ रोजी वडनेर कडून आदीलाबादकडे कंटेनर वाहनामध्ये अवैधरित्या म्हैस जातीचे जनावर घेऊन जात असल्याची मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ठाणेदार महाले यांनी आपल्या पोलीस ताफ्या राष्ट्रीय महामार्गावरील सैनिक धाब्याजवळ नाकाबंदी करून अवैध जनावरे तस्करी करणाऱ्या कंटेनरला अडविले असता सदर वाहन भरधाव पुढे गेला त्याचा पाठलाग करून काही अंतरावर कंटेनरला पकडून ४७ म्हैस जातीच्या रेड्यांची सुटका करून ३४ लाख ४० हजार रुपये चा मुद्देमाल जप्त केला.

मिळालेल्या गुप्त माहितीवरून वाहन क्रमांक एच आर ३८ ए बी ३२३२ या कंटेनर वाहनामध्ये अवैधरित्या म्हैस जातीच्या जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती वडकी स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विजय महाले यांना मिळाली त्या आधारे ठाणेदार महाले यांनी आपल्या पोलीस ताफ्या सह राष्ट्रीय महामार्गावरील वडकी येथील सैनिक धाब्याजवळ नाकाबंदी करून सदर कंटेनर वाहन यास थांबविण्याचा प्रयत्न केला असता कंटेनर भरधाव वेगाने समोर निघून गेला असता वडकी पोलिसांनी पाठलाग करून काही अंतरावर अवैध जनावरांची वाहतूक करणारा कंटेनर पकडला. त्याची पाहणी केली असता सदर कंटेनर वाहनामध्ये ४७ नग म्हैस जातीचे रेडे प्रत्येकी किंमत वीस हजार प्रमाणे नऊ लाख चाळीस हजार रुपये व कंटेनर किंमत २५ लाख असा एकूण ३४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पंचा समक्ष घटनास्थळावरून जप्त करण्यात आला व यातील दोन इसमां विरुद्ध पोलीस स्टेशन वडकीला गुन्हा दाखल करणे सुरू होते.

सदर प्रकरणाची कार्यवाही पवन बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, रामेश्वर व्यंजने उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनात वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय महाले सोबत पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव पोलीस हवालदार निलेश वाढई विलास जाधव एनपीसी अंकुश पाटोळे सचिन नेवारे चालक विनोद नागरगोजे यांनी पार पाडली. अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर वडकी पोलीस स्टेशनचे दबंग ठाणेदार विजय महाले यांची सतत धडक कारवाई सुरू आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’ भेटायला येत आहे

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता …

छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे तख्त दिल्लीचे अन लक्ष्य महाराष्ट्राचे स्वप्न साकार – राहुल मेश्राम

भिलेवाडा येथे संस्कार शिबिरात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- हिंदवी स्वराज्य स्थापनेतुन महाराष्ट्रासह संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved