Breaking News

आरोग्य दुत व निर्भिड पत्रकार अशी ओळख असलेला व्यक्तीमत्व प्रमोद राऊत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :-प्रत्येकजण आपल्या आयुष्यात आपलं वेगळेपण जोपासत असतो.प्रत्येकाची आवड वेगळी असते तर कुणाची पॅशन वेगळी असते.तर कुणी एखाद्या ध्येयाला आपलं कर्तव्य समजत असतो.अश्याच कर्तव्याची व पॅशनची व सामाजिक बांधिलकी म्हणून सरमिसळही अगदी काटेकोरपणे जगणारा सशक्त विचाराचा धनी एकाच वेळी आरोग्य दूत व निर्भिड पत्रकार असं बिरुद मिरवणारं व्यक्तीमत्व म्हणजे प्रमोद राऊत यांचा (दि.१०ऑगस्ट) वाढदिवस…

खरं तर प्रमोद राऊत ह्यांची जन्मभूमी जरी चिमुर तालुक्यातील खडसंगी येथील असली तरी त्यांची कर्मभूमी मात्र पोंभूर्ण्याचीच.सिकलसेल या आजाराबद्दल जनजागृती
प्रकल्पाच्या निमित्ताने प्रमोद पोंभूर्ण्यात दाखल झाले.
सिकलसेल‌ ग्रस्तांची तपासणी करून त्यांना उपचारात सहकार्य करने हा तसा खुप मोठा टास्क होता.आरोग्य सेवा परम सेवा अशी मनात गाठ बांधून ठेवणाऱ्या प्रमोदनी मात्र पोंभूर्णा तालूका पिंजून काढत सिकलसेल आजाराची माहिती व जनजागृती खेड्या पाड्यात केली.अनेकांना जागृत करत सिकलसेलची तपासणी करून घेतली.त्यांनी केलेली पोंभूर्णा तालुक्यातील सिकलसेल ग्रस्तांची खरी आकडेवारी त्यांनी शासनापर्यंत पोहचवली.त्याच आधारे सिकलसेल ग्रस्तांसाठी आरोग्य सल्ला व मार्गदर्शन व उपचारासाठीचे काम सुरू आहे.प्रमोद राऊत हे इतक्यावरच थांबले नाही.त्यांनी सिकलसेल रुग्णांना वेळोवेळी मदत केले.प्रकल्प बंद झाला तरी प्रमोद राऊत यांचं काम आजही सुरूच आहे. कारण रुग्ण आजही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतात.हिच त्यांच्या प्रामाणिकपणाची पावती आहे.खरं तर प्रकल्प बंद झाला असला तरी प्रमोद मात्र थांबला नाही.ज्याला काहीतरी करायचं असतं तो कधीच थांबत नसतो.प्रमोदनी वृत्तपत्र सेवेची लेखनी उचलली.हि त्याची दुसरी इनिंग.खरं तर प्रमोद हा शांत स्वभावाचा असला तरी निर्भिड आहे.दैनिक पुण्यनगरी वृत्तपत्रात चिमुर तालुक्यातील खडसंगी प्रतिनिधी म्हणून प्रमोद ने काम सुरू केला.प्रमोदनी गावातील अनेक ज्वलंत विषय त्यांनी आपल्या वृत्तपत्रातून मांडून अनेकांना आपल्या नावाचा परिचय करून दिला.बातम्यांमध्ये जीव ओतन्याची कला प्रमोद ला खुप चांगली जमते.त्यांनी पत्रकारितेचा पुरस्कार त्यांनी आपल्या नावे केले.
प्रमोद राऊत जेवढा शांत, संयमी आहे तेवढाच निर्भिड व धडाकेबाज व्यक्तीमत्वाचा आहे.पण प्रमोद हा हळव्या स्वभावाचा व भावनिक ही आहे.हे तेवढेच खरे आहे.अनेकदा त्याचेवर काही प्रसंग आले त्यामुळे अनेकदा प्रमोद भावनिक रित्या तुटला.पण म्हणतात ना सुर्याला अंधार कायमचा झाकत नसतो.तसच प्रमोदच्या बाबतीत घडलं.त्यांनी नैराश्याला,अंधाराला बाजूला झुगारून देत त्यांनी नवी सुरुवात केली.ती यशस्वी झाली.आज प्रमोदची ओळख चांगल्या पत्रकारांमध्ये घेतली जाते.
प्रमोदची हि घोडदौड अशीच यशस्वीरीत्या सुरू राहावी.दिवसेंदिवस प्रगतीचे नवे शिखर सर करीत राहिल यात शंका नाही.

शांत स्वभाव,भक्कम अनुभव,विचारवंत,सामाजिक व राजकीय विषयांवर झणझणीत भाष्य करणारा,आरोग्य सेवा परम सेवा म्हणून व्रतस्थ सेवा देणारा आरोग्य दूत व निर्भिड पत्रकार प्रमोद राऊत यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

आपल्या आयुष्यासाठी आरोग्यासाठी सुखासाठी खुप खुप शुभेच्छा.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’ भेटायला येत आहे

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता …

छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे तख्त दिल्लीचे अन लक्ष्य महाराष्ट्राचे स्वप्न साकार – राहुल मेश्राम

भिलेवाडा येथे संस्कार शिबिरात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- हिंदवी स्वराज्य स्थापनेतुन महाराष्ट्रासह संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved