Breaking News

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सरस्वती कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सरस्वती कन्या विद्यालय नेरी येथील जुनेद शहा या विद्यार्थ्याने “वुशु” या क्रीडा प्रकारात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावून त्याने सरस्वती कन्या विद्यालय,नेरी च्या शिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला. या यशाने संपूर्ण विद्यालयात आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. जुनेद शहा हा विद्यार्थी अमरावती येथे होणाऱ्या विभागीय स्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

या यशाचे श्रेय मुख्याध्यापिका सौ.अर्चना संजयराव डोंगरे , प्रशिक्षक डॉ.सुशांत इंदोरकर, चंद्रदास ढोले सर,सुनील पोहनकर सर, वर्गशिक्षक नरहरी पिसे सर, आई, वडील व शाळेतील सर्व शिक्षक वृंदांना दिले. स्पर्धचे उदघाटन विजय डोबाळे यांनी केले आयोजन शिहान विनय बोढे तर पंच मंजित मंडल, अंकुश मुलेवार , अकेश मडावी हे होते.याप्रसंगी संजयभाऊ डोंगरे, सचिव इंदिरा ज्ञान प्रसारक मंडळ, नेरी शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगती अशीच झाली पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मालवाहू गाड्यामुळे बाजार पेठेतील रहदारीस अडथळा-नगरपरिषदेचे दुर्लक्ष

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरातील टिळक वॉर्ड येथील जुनी व मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या …

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved