Breaking News

सुपरस्टार थलपती विजयचा ‘थूपाकी’ मराठीत अल्ट्रा झकासवर

मुंबई-राम कोंडीलकर

मुंबई : आपल्या विशेष अभिनय कौशल्यासाठी ओळखला जाणारा तमिळ चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता ‘सुपरस्टार थलपती विजय’ याचा जबरदस्त अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘थूपाकी’ २५ सप्टेंबर पासून, महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर आता मराठीत पाहायला मिळणार आहे.चित्रपटाची कथा एका सैनिकाभोवती फिरते जो आपली ड्यूटि संपवून घरी सुट्टीसाठी परतला आहे. सुट्टीच्या काळात त्याच्या पोलिस मित्रासोबत फिरत असताना, एक दहशतवादी टोळी जी मुंबई शहराला उद्ध्वस्त करू पाहत आहे, त्याची त्याला चाहूल लागते. पुढे जे काही होतं ते दिग्दर्शक मुरगुडूस यांनी विलक्षण मांडलं असून विजयने सैनिकाची उल्लेखनीय भूमिका साकारली आहे.

“आम्ही सातत्याने प्रेक्षकांच्या मनोरंजनाची गरज आणि त्यांची बदलती आवड जपण्याच्या प्रयत्नात असतो. म्हणूनच ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीच्या माध्यमातून ‘थूपाकी’ सारखा सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी मराठीमध्ये रूपांतर करून आम्ही घेऊन येत आहोत. चित्रपटाला भरभरून प्रेम मिळेल याची खात्री वाटते.” असे अल्ट्रा मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सीईओ श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.अधिक माहितीसाठी www.ultrajhakaas.com ला भेट द्या. गणरायाच्या आगमनाची तयारी करता करता झकास मनोरंजनासोबतच एकापेक्षा एक जबरदस्त अॅक्शन थ्रिलर अनुभवण्यासाठी लगेच डाउनलोड करा ‘अल्ट्रा झकास ओटीटी’ ॲप आणि तुमच्या कुटुंबासोबत अमर्याद आनंद घ्या अल्ट्रा झकास वरील एचडी कन्टेंटचा.
App link:
https://ultrajhakaas.app.link
*जबरदस्त अॅक्शन थ्रिलर ‘थूपाकी’ चित्रपटाचे प्रोमो पाहण्यासाठी लिंक*
https://www.facebook.com/UltraJhakaas
https://www.instagram.com/ultrajhakaas
https://www.youtube.com/@ultrajhakaas

जनसंपर्क : राम कोंडीलकर,
राम पब्लिसिटी, मुंबई
इमेल : ramkondilkar.pr@gmail.com
*मोबाईल* – WhatsApp : 9821498658

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मालवाहू गाड्यामुळे बाजार पेठेतील रहदारीस अडथळा-नगरपरिषदेचे दुर्लक्ष

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरातील टिळक वॉर्ड येथील जुनी व मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या …

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved