शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या होऊ द्या चर्चा उपक्रमाचा ब्रम्हपुरी येथे शुभारं
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
ब्रह्मपुरी:-खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळविणाऱ्या केंद्र व राज्यातील बोलघेवड्या भाजपा सरकारचा भंडाफोड करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने होऊ द्या चर्चा उपक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे. नरेंद्र मोदींनी मोठी आश्वासने दिली होती. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दुप्पट हमी भाव, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख, इंधन दरात कपात, महागाई नियंत्रणात ठेवण्याचे आश्वासन दिले होते. ही सर्व आश्वासने खोटी ठरली आहेत. भाजपने दिलेली आश्वासने तुमच्यापर्यंत पोहोचली काय ? यात समुद्रातले शिवस्मारक झाले का ? दाऊद / माल्याला फरफटत आणले काय? गंगा स्वच्छ झाली का? स्मार्ट सिटी झाल्या का? मराठा आरक्षण दिले का? धनगर आरक्षण दिले का? गुगलबरोबर ८०० रेल्वेस्टेशन फ्री वायफाय देण्याचा ४.५० लाख कोटींच्या कराराचे काय झाले? 9 वर्षात 18 ते 20 तास काम करणाऱ्या स्वयंघोषित चौकीदाराने नेमके काय केले. अशी विचारणा करून मोहिमेच्या माध्यमातून सत्ताधान्यांचा खोटारडेपणा उघड केला जाणार आहे. दुसरीकडे पेट्रोल, डिझेल, सिलिंडर, अन्नधान्य भाजीपाल्यासह दैनंदिन गरजांच्या वस्तूंच्या संख्या वाढलेल्या आणि आधीच्या किंमतीचे कोष्टकच लोकांसमोर ठेवून त्यांना खरी वस्तुस्थिती दाखविण्यात आली. पेट्रोल ६० रुपये होते ते आता १०७ रुपयांना मिळत आहे. याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने वेधले जाणार आहे.
नागपूर येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात ‘होऊ द्या चर्चा कार्यक्रम आयोजित करून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा भांडाफोड करण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले होते. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार आता हा उपक्रम राबिवला जात असून, लोकसभा व विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात याबाबत माहिती दिली जाणार असून होऊ द्या चर्चा उपक्रमाचा शुभारंभ ब्रम्हपुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आला. यावेळी शिवसेना गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख महेश केदारी, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका नर्मदाताई बोरेकर, युवती सेना जिल्हा संघटिका प्रतिभा मांडवकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उबाठा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हा प्रमुख प्रा. अमृत नखाते यांच्या नेतृत्वात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसेना तालुकाप्रमुख केवळराम पारधी, रामेश्वर राखडे उप तालुका प्रमुख ब्रह्मपुरी, शामराव भानारकर माजी शहरप्रमुख, उर्मिला अलोने उपजिल्हा संघटिका महिला आघाडी, कुंदा कमाने तालुका संघटिका ब्रह्मपुरी, ललिता कांबळे शहर संघटिका, गुलाब बागडे विभाग प्रमुख, रमाकांत अरगेलवार एसटी कामगार सेना, प्रा. श्याम करंबे माजी विधानसभा समन्वयक, यादव रावेकर युवासेना तालुका प्रमुख, करमअली सय्यद युवासेना शहरप्रमुख, मोरेश्वर अलोने विभाग प्रमुख, जया कावळे, गणेश बागडे शाखाप्रमुख यांच्यासह शिवसेना, महिला आघाडी, युवती सेनाचे बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.