Breaking News

!!!दीपावली दिवाळी सणांचा राजा म्हणजे नेमकं काय!!!

खरं तर आपल्या हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण येतोय दीपावली, ज्याला आपण दिवाळी म्हणतो

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगांव:-  ३०% लोकांनाच माहीत आहे की दिवाळी हा सण का साजरा केला जातो. बाकी ७०% तर फक्त लहानपणापासून असे समजतात की फक्त दिवे लावणे, फराळ, आणि फटाके फोडणे, लक्ष्मी पूजन करणे, बस हीच आहे दिवाळी. असो काही हरकत नाही. मी तुम्हाला या पोस्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की दिवाळी का साजरी केली जाते आणि दिवाळीला प्रभु श्रीराम यांच्या जागी महालक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा का केली जाते.

नीट वाचा

दिवाळी हा सण हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी प्रभु श्रीराम, बंधू लक्ष्मण आणि सितामाता यांच्यासोबत १४ वर्षाचा वनवास संपल्यानंतर अयोध्येत परत आले होते.
अयोध्या नगरीमध्ये जेव्हा हे कळले की प्रभु श्रीरामाने रावणाचा अंत केला आहे आणि अयोध्येमध्ये पुन्हा येणार आहेत तेव्हा पूर्ण अयोध्येमधल्या लोकांनी त्या जल्लोषात दसऱ्यापासूनच रांगोळी आणि दिव्यांनी अयोध्या सजवली होती.

जेव्हा दसऱ्याच्या दिवशी रावणाचा अंत झाला त्याच्याबरोबर २१ दिवसांनी श्रीराम हे अयोध्येत पोहोचले होते तेव्हापासून दिवाळी हा सण साजरा केला जातो.
म्हणजे लाखो वर्षांपासूनची ही परंपरा अजूनही हिंदू बांधव साजरी करतात.

दिवाळी हा सण ५ दिवस चालणारा सण आहे आणि याच्या प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व आहे.
चला तर तुम्हांला या ५ दिवसाचं महत्त्व सांगतो.

१:- पहिला दिवस आहे धनत्रयोदशी. पूर्वीच्या मान्यतेनुसार सगळ्या देवांनी असुरांसोबत समुद्रमंथन केलं होतं तेव्हा समुद्रातून १४ रत्न निघाले. याच्यातील एक आहे भगवान धन्वंतरी. आपल्या पंचांगानुसार पितृपक्षाच्या १३ दिवसांनंतर भगवान धन्वंतरी हे समुद्रातून हातामध्ये अमृताचा कुंभ घेऊन प्रकट झाले. भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक आहेत. त्यांनीच पूर्ण संसाराला आयुर्वेदाची ओळख करून दिली. त्यादिवसांपासून या दिवसाला धनतेरस, धनत्रयोदशी असे नांव पडले आणि भगवान धन्वंतरी यांच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो.

२:- दिवाळीचा दुसरा दिवस आहे नरकचतुर्दशी.

एके काळी या संसारात भूमिपुत्र नरकासुराचा आतंक होता, त्याला वरदान होतं की त्याचा मृत्यू फक्त त्याच्या आईच्या हातानेच होऊ शकतो. पुढच्या जन्मात भूमिदेवीने सत्यभामाच्या रूपात अवतार घेतला, सत्यभामेचे लग्न भगवान श्रीकृष्णासोबत झाले. त्यानंतर सत्यभामेने नरकासुराचा अंत केला.
तेव्हापासून आजपर्यंत त्या दिवसाला नरकचतुर्दशी या नावाने ओळखलं जातं.

३:- दिवाळीचा तिसरा दिवस आहे लक्ष्मीपुजन.

देव आणि दैत्य जेव्हा समुद्र मंथन करत होते तेव्हा माता लक्ष्मी प्रकट झाली होती. तेव्हापासून त्या दिवशी आपल्या घरी भरपूर यश, सुख आणि संपत्तीसाठी माता लक्ष्मी यांची पुजा होते.

दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी यांच्यासोबत श्री गणेश यांची सुध्दा पुजा होते.
पुरातन मान्यतेनुसार महालक्ष्मीला कोणतेही संतान नव्हते आणि माता पार्वतीचे २ पुत्र होते.

लक्ष्मीने पार्वतीजवळ श्री गणेश यांना दत्तक घेण्याची इच्छा प्रकट केली. पार्वतीला चिंता होती की लक्ष्मी कधीच एका जागी थांबत नाही. मग गणपतीची काळजी ती कशी घेईल. याच्यावर लक्ष्मी म्हणाली की मी जिथे जाईन तिथे गणपतीला सोबतच घेऊन जाईन.
म्हणून तेव्हापासून
जिथे लक्ष्मीची तिथे गणपतीची सुध्दा पुजा होते.

खरंतर दिवाळीच्या दिवशी श्रीराम अयोध्येत आले होते परंतु या दिवशी लक्ष्मी आणि श्री गणेशाची पुजा होते.
पुरातन ग्रंथानुसार त्यावेळी भगवान विष्णू हे आराम करतात आणि श्रीराम हे विष्णूचा अवतार आहेत. त्यामुळे श्रीराम यांची पुजा केली जात नाही.

४:- मित्रांनो अश्विन अमावस्येला लक्ष्मीपुजन झाल्यानंतर बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा होतो.
साडे तीन मुहूर्तांपैकी एक हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.
अक्षयतृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी हे पूर्ण मुहूर्त असून दिवाळी पाडवा हा अर्ध मुहूर्त आहे. यादिवशी सोने खरेदी, सुवासिनी कडून पतिला ओवाळले जाते.
असे खूप काही महत्त्व आहेत
व्यापारी लोकांचे नविन वर्ष याच पाडव्यापासून सुरू होते.

हिशोबाच्या नविन वह्या ज्याला खतावणी म्हणतात त्यांचे पुजन करून नवीन सुरूवात केली जाते.
कोणतीही नवीन गोष्ट विकत घेण्यासाठी हा उत्तम मुहूर्त मानला जातो.

५:- दिवाळीचा पाचवा दिवस आहे गोवर्धन पुजा.
रामायणानुसार जेव्हा श्री राम हे लंकेवर आक्रमण करण्यासाठी सेतूचे बांधकाम करत होते तेव्हा सगळे वानर हे आप आपल्या शक्तीनुसार दगड जमा करत होते तेव्हा हनुमानजीनी हा सेतू बांधण्यासाठी गोवर्धन पर्वतच उचलून आणला होता.
परंतु ते यायच्या आतच सेतूचं काम झालं होतं. सेतूमध्ये मदत नाही करता आली म्हणून गोवर्धन पर्वताने त्याचं दुःख श्रीरामांकडे प्रकट केलं. श्री राम यांनी वचन दिलं की पुढच्या जन्मात ते त्या पर्वताचा उपयोग नक्की करतील.
आणि हनुमंताला सांगितले की हा पर्वत पुन्हा त्या जागी ठेवून ये.
पुढच्या जन्मात जेव्हा भगवंतांनी कृष्ण अवतार घेतला तेव्हा गावातील लोकांना गोवर्धनाची पुजा करण्यास सांगितली.
याला नाराज होऊन इंद्राने गोवर्धन पर्वतावर आक्रमण केले. तेव्हा श्रीकृष्णाने लोकांना वाचवण्यासाठी पर्वत करंगळीवर उचलला आणि इंद्राचा गर्व मोडला.
तेव्हापासून गोवर्धनाची पुजा केली जाते.

६:- सहावा दिवस आहे भाऊबीज
यादिवशी देवता यमराज आपल्या बहिणीला यमुनेला भेटायला त्यांच्या घरी गेले.
त्यांच्या बहिणीकडून झालेला आदर सत्कार पाहून ते खूप प्रसन्न झाले. तेव्हा यमराजांनी हे वरदान दिले की या दिवशी जो भाऊ त्याच्या बहिणीच्या घरी जाईल त्याला संकटापासून मुक्ती मिळेल आणि मोक्ष मिळेल. तेव्हापासून हा दिवस भाऊबीज नावाने साजरा होतो.
यादिवशी सगळ्या बहिणी तिच्या भावाच्या सुरक्षेची देवाला प्रार्थना करतात.

तर मित्रांनो हे ६ दिवस दिवाळीचे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.
आपण हिंदू आहोत आपल्याला या गोष्टी १००% माहीत असायला हवी

*जय श्रीराम*

सर्वाँना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

आपणास व आपणा सर्वांच्या परीवारास *उद्यापासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या शुभपर्वानिमित्त माझ्याकडून अनेक हार्दिक शुभेच्छा🪔🏮🕯️*

|| शुभ दिपावली || *९ नोव्हेंबर * पासून दीपावली ला सुरुवात होत आहे.
सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा…. !!!!!
* ९ नोव्हेंबर २०२३- वसुबारस !*
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !
*१० नोव्हेंबर २०२३- धनत्रयोदशी !*
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !
*१२ नोव्हेंबर २३- नरकचतुर्दशी !*
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!
*१२ नोव्हेंबर २०२३- लक्ष्मीपूजन !*
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
* १४ नोव्हेंबर २०२३- *पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !*
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
* १५ नोव्हेंबर२०२३- *भाऊबीज !*
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहू दे !
*ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास*
*आनंदाची आणि भरभराटीची जावो*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’ भेटायला येत आहे

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता …

छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे तख्त दिल्लीचे अन लक्ष्य महाराष्ट्राचे स्वप्न साकार – राहुल मेश्राम

भिलेवाडा येथे संस्कार शिबिरात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- हिंदवी स्वराज्य स्थापनेतुन महाराष्ट्रासह संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved