Breaking News

स्व. आ. राजीव राजळे यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव मध्ये “राजीव बुक फेस्ट” चे आयोजन उद्घाटनासाठी “यु-ट्युब फ्रेम प्राध्यापक विठ्ठल कांगणे परभणी” आणि आमदार सत्यजित तांबे उपस्थित राहणार

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगांव:-5 डिसेंबर 2023 याबाबत सविस्तर वृत्त असे की स्वर्गीय माजी आमदार राजू जी राजळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ गेल्या सहा वर्षापासून माजी नगरसेवक रिंकू उर्फ महेश फलके यांच्या संकल्पनेतून चला वाचन संस्कृती टिकवूया या उद्देशाने स्वर्गीय आमदार राजीवजी राजळे यांचे जयंती निमित्त राजीव राजळे मित्र मंडळ शेवगाव यांनी दरवर्षीप्रमाणे राजीव बुक फेस्ट 2023 चे आयोजन स्वराज मंगल कार्यालय आखेगाव रोड शेवगाव येथे केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय आमदार राजीव राजळे यांची जयंती 5 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता होणार असून दिनांक 5,6 व 7 डिसेंबर रोजी पुस्तक प्रदर्शन पुस्तक प्रेमींसाठी सकाळी 9.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत खुले असणार आहे.

आमदार सत्यजितदादा तांबे, विधान परिषद सदस्य, यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी चे संचालक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर हे असणार असून यांचे मार्गदर्शन यावेळी कार्यक्रमासाठी असेल अशी माहिती राजीव राजळे मित्र मंडळाचे सदस्य नगरसेवक महेश फलके यांनी दिली.

स्वर्गीय आमदार राजीवजी राजळे पुस्तक प्रेमी होते, वाचनाच्या आवडीने अभ्यासू आमदार म्हणून ते सर्व परिचित होते, यातून त्यांना उत्कृष्ट संसद पटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यामुळे वाचाल तर वाचाल यातून वाचनाचे महत्त्व आपल्याला लक्षात येते, वाचन मोठी शक्ती असून ज्याप्रमाणे शरीराच्या वाढीसाठी माणसाला अन्नाची गरज असते त्याचप्रमाणे मनाचे आणि मेंदूच्या मशागतीसाठी वाचन गरजेचे आहे, वाचताने ज्ञानाच्या कक्षा वृंदावतात, विचारांमध्ये परिपकवता येते वैचारिक उंची वाढण्यास मदत होऊन, वाचनाने व्यक्तिमत्त्वाला तेच आणि सूर्यासारखी झळाली प्राप्त होते. वाचनाबद्दल सकारात्मकता वाढावी या उद्देशाने पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे नगरसेवक महेश फलके यांनी सांगितले.

*ताजा कलम*

माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते महेश उर्फ रिंकू फलके हे वर्षभर सीड बँक विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण अधिकाऱ्यांचे सत्कार आणि मार्गदर्शन पुस्तक प्रदर्शन महिला मुलं आणि बालकांना प्रोत्साहन मिळतील अशा विविध स्पर्धा वर्षभर आयोजित करीत असतात याला खूप मोठा प्रतिसाद शेवगाव ची जनता देत असते

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved