Breaking News

शिव पानंद शेतरस्ते खुले करणारांना शेतकऱ्यांचे आशिर्वाद मिळतील – समाजिक कार्यकर्त शरद पवळे

श्रीगोंदा येथे शिव पाणंद शेतरस्ता मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन

विशेष प्रतिनिधी-श्रीगोंदा

श्रीगोंदा:-शिव पानंद रस्ता प्रणेते शेतकरी नेते शरदराव पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या उपस्थितीमध्ये शिव पाणंद रस्ता चर्चासत्राचे आयोजन रविवार 3 डिसेंबर 2023 रोजी श्रीगोंदा मार्केट कमिटी या ठिकाणी आज पार पडले.
शेतकऱ्यांच्या रोजच्या आयुष्यात अतिशय कटकटीचा असलेला विषय म्हणजे शेत रस्ते आणि या रस्त्यामुळे अनेक वाद निर्माण होत आहेत व शेतकऱ्यांना आर्थिक व कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे म्हणून पारनेर चे सामाजिक कार्यकर्ते श्री शरद पवळे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचे काम केले आहे शेत पाणंद शिव रस्ते यावर मागणी अर्ज केल्यानंतर ६० दिवसात निर्णय निकाली काढण्याचे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत व सार्वजनिक शिव पाणंद रस्त्याचे मोजणी आणि रस्ता करून देण्याचा खर्च हा प्रशासनाने करायचा आहे.

असे स्पष्ट आदेश निकालात दिले आहेत त्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी आता मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात रस्ते मागणी बाबत अर्ज करून आपली सुटका करून घ्यावी तसेच प्रत्येक गावात शेत ग्राम समिती स्थापन करून सरपंच ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष यांनी पुढाकार घेऊन एकत्रित रस्ता केसेस साठी एकत्रित मागणी प्रशासनाला करावी व शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा या साठी शिव पाणंद रस्ते कृती समिती तालुक्यात स्थापन करून न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊ असे चर्चा सत्रामध्ये ठरले. यावेळी श्रीगोंदा मार्केट कमिटीचे विद्यमान संचालक अजित जामदार ,संदीप रोडे प्रगतशील शेतकरी परेश वाबळे कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र निळकंठ नागवडे, ॲड.गोरख कडूस पाटील, दादासाहेब जंगले, सुनील गायकवाड सर, किरण कुरुमकर,यांच बरोबर सतीश डेबरे ,शेतकरी नेते टिळक भोस, प्रगतशील शेतकरी उमेश बोरुडे, मिलिंद नागवडे, रामचंद्र अडसरे, पांडुरंग जगदाळे ,माजी सरपंच फुलसिंग मांडे,अमोल गाढवे, वांगदरी सोसायटीचे चेअरमन विजय नागवडे, ग्रामपंचायत सदस्य तुषार नागवडे, गुरू गायकवाड ,राजेंद्र उंडे,भाऊसाहेब गवळी, प्रवीण फापाळे,अतुल दरेकर,दत्तात्रय दरेकर, छगन होले शेतकरी नेते अनिल भुजबळ, अशोक कणसे,विलास कुरूमकर,शंकर साबळे,भानुदास वाघ,मधुकर जगताप,प्रदीप घोरपडे,शिवाजी ढमे,संजय गायकवाड,राहुल खोडवे,आनंद लगड,राजेंद्र रोडे,दिलीप होले,बाळासाहेब बनकर,श्रीकांत कांडेकर उपस्थित होते.

चर्चासत्राच्या निमित्ताने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या प्रशासना बाबत असलेल्या व्यथा आणि कथा मांडल्या त्याचप्रमाणे आमच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही एक चांगला स्वीकारलेला मार्ग आहे असे मत व्यक्त केले या संबंधी मार्गदर्शन करताना शरदराव पवळे यांनी अनेक विविध जीआर च्या माध्यमातून आणि विविध अर्जाच्या माध्यमातून शेतकरी प्रशासनाच्या दारापर्यंत जोपर्यंत शेतकऱ्यांना शंभर टक्के शिव आणि पाणंद रस्ते मोकळे होऊन निकाली निघत नाही तोपर्यंत सर्वांच्या समवेत आहे अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गायकवाड यांनी केले व आभार प्रदर्शन राजेंद्र निळकंठ नागवडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी परिसरातील व श्रीगोंदा तालुक्यातील अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved