Breaking News

शेवगावच्या बाळासाहेब भारदे हायस्कूल 1985 च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 38 वर्षानंतर भरवला शाळेत “स्नेहसंमेलन” आणि “कृतज्ञता सोहळा”

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगांव:-बाळासाहेब भारदे स्कूलच्या 1985 च्या एस.एस.सी. च्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 38 वर्षानंतर काल दिनांक 3 डिसेंबर रविवारी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आपले सध्याचे पद प्रतिष्ठा सर्व बाजूला ठेवून एक दिवसासाठी लहान मूल होऊन प्रत्यक्ष वर्गात जाऊन आपले माजी शिक्षक माजी प्राचार्य यांच्या मार्गदर्शनात आणि सहवासात एक दिवस घालविला आपल्या जुन्या बेंचवर बसून आपल्या शालेय कारकिर्दीतील जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला या कार्यक्रमासाठी ऍड. विवेक नाईक, मिलिंद काटे, कचरू दुबे, राजेंद्र मुळे, सचिन ढुमणे सराफ व्यावसायिक रवींद्र डहाळे , रामेश्वर जाजू पंडित सोनटक्के विजय रणमले यांच्यासह सुमारे 35 विद्यार्थी उपस्थित होते माझी प्राचार्य एस व्ही उर्फ सुधाकर कुलकर्णी शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष हरीश भारदे माजी प्राचार्य रमेश भारदे माजी ग्रंथपाल रागिनी भारदे देशपांडे सर एकनाथ शिरसाठ सर रमेश पोरवाल कचरुलाल सारडा सर आजी प्राचार्य सरोदे सर यांनी व्यासपीठ उपलब्ध करून सहकार्य केले.

सर आदींचा यथोचित सन्मान करून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा करून दिला सकाळी नऊ वाजता एकत्र जमलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सायंकाळ कधी झाली हे कळालेच नाही दुपारी तीन नंतर रवींद्र डहाळे यांच्या फार्म हाऊस वर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला तब्बल 38 वर्षानंतर आपल्या व्यस्त झालेल्या जीवनातून आपली मुलं संसार नोकरी व्यवसाय यांचा विसर पडला होता लहानपण देगा देवा या उक्तीप्रमाणे दिवसभर स्वच्छंद आनंदाने हसत खेळत आणि बागडत आपल्या आठवणींची शिदोरी आपल्या सोबत घेऊन जीवनाच्या रहाटगाडग्यात पुन्हा प्रवेश करते झाले.

*ताजा कलम*

बाळासाहेब भारदे स्कूल पूर्वाश्रमीचे शेवगाव इंग्लिश स्कूल या नावाने प्रसिद्ध होते शाळेच्या सुमारे पन्नास वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत 1967 ते 2010 पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी स्नेहसंमेलन रिबॉंडिंग सवंगडी लय भारी री युनियन माजी विद्यार्थी मेळावा स्नेहमीलन आदिनावांनी एकत्र येऊन आपली शाळा गुरुजन वर्ग बंधू भगिनी याबद्दल कायमच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 2 : दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, …

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved