Breaking News

महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या संघाला यश

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा)- चेन्नई (तामिळनाडू) येथील जवाहरलाल नेहरू इंदोर स्टेडियम नुकत्याच पार पडलेल्या महिला वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाचे सचिव डॉ. अमरकांत चकोले यांनी महिला महाराष्ट्र संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेमध्ये वीस राज्याने सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पाँडिचेरी राज्याने तर महाराष्ट्र संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.महाराष्ट्र महिला संघामध्ये कर्णधार प्राची चटप (भंडारा), वंशिका अनिल कांबळे, (परभणी पुर्णे छत्रपती संभाजी नगर), मिताली गणवीर (भंडारा), श्रुती कडव (नागपूर), नेहा कांगटे (जळगाव) उर्वशी गुप्ता (अमरावती), शिल्पा डोंगरे (धाराशिव), प्रिती शिंदे (धाराशिव), अनुजा लोंढे (धाराशिव), अपेक्षा सापुते (नाशिक) गायत्री इवरकर (वाशिम), अनुराधा मोरे (ठाणे) यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. संघासोबत व्यवस्थापक म्हणून पूनम कोकाटे, प्रशिक्षक भावना धूर्वे, नागपूर राष्ट्रीय पंच अनिल मोटे यांचा समावेश होता. त्यावेळी गुजरात, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश येथील संघाचा पराभव केला.

तर शेवटी पांडेचैरी व महाराष्ट्र संघात अतिशय रोमांचिक सामना झाला आणि त्या अल्पशा गुणांनी पांडेचैरी संघात ला विजेते व महाराष्ट्र संघाला उपविजेता क्रमांक पटकाविला आहे.त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आट्यापाट्या फेडरेशन भारत सरकार संघाचे मुख्य सचिव डॉ. दीपक कविश्वर, महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महाराष्ट्र राज्य महामंडळाचे सचिव डॉ. अमरकांत चकोले, भंडारा आट्यापाट्या संघाचे प्रशिक्षक श्याम देशमुख यांना दिले आहे. बक्षिस वितरण आट्यापाट्या फेडरेशन भारत सरकार संघाचे मुख्य सचिव डॉ.दीपक कविश्वर, महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महाराष्ट्र राज्य महामंडळाचे सचिव डॉ. अमरकांत चकोले, तामिळनाडू आट्यापाट्या असोशिएशनचे अध्यक्ष जी.कलाइचेलवन, सचिव एन. शिवाशुभ्रामणयन इत्यादी मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल मेंढे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, नाना पटोले, जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी, विदर्भ कोकण बॅंक शाखा लाखनीचे प्रबंधक धनंजय खंडेरा, लोकस्वराज्य पार्टीचे प्रदेश अध्यक्ष के. झेड. शेंडे, भंडारा, महिला पत संस्थेच्या अध्यक्ष दुर्गा डोरले, जिल्हा परिषद सदस्य विनोद बान्ते, गट शिक्षणाधिकारी शंकर राठोड, रामविलास सारडा, ईश्वरलालाल काबरा, समीर नवाज, प्रदिप काटेखाये, यशवंत बिरे, राजु सतदेवे, राहुल मेश्राम, अशोक बन्सोड, दुर्गा चटप, जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्रा. कार्तिक पन्निकर व महाविद्यालयातील क्रिडा व प्राध्यापक वर्गांनी विजयी चमुंचे अभिनंदन केले व विजय खेळाडूंचा सर्व स्तरातून शुभेच्छा व कौतुकांचा वर्षाव होत आहे. तसेच पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगांवकर चा दणका मोडला शहराच्या मुख्य गटारीला अतिक्रमणाचा विळखा घालणाऱ्यांचा मणका

येत्या पावसाळ्यात शेवगाव शहराची होणार “तुंबापुरी” पावसाळा पूर्व नालेसफाईला नगरपरिषद आरोग्य विभागाकडून दिरंगाई विशेष प्रतिनिधी-अविनाश …

इयत्ता 12वीचा निकाल उद्या

शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल नागपूर, दि. 20: फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved