Breaking News

मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांनी मांडला आहे आईच्या नावाने गोंधळ

मुंबई – राम कोंडीलकर

मुंबई:-अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडच्या ‘छापा काटा’ चित्रपटातील अभय जोधपुरकर, आर्या आंबेकर यांच्या आवाजातल्या ‘कुणी समजवा माझ्या मनाला’ आणि सुनिधि चौहान यांच्या आवाजतल्या ‘मन हे गुंतले’ या दोन्ही गाण्यांना दहा लाखांहून अधिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. तसेच आदर्श शिंदेच्या आवाजतलं ‘छापा काटा’ गाणं महाराष्ट्रभर धुमाकूळ घालत असताना चित्रपटातील आणखी एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.महाराष्ट्रात लग्न समारंभाचा कार्यभाग म्हणून जवळपास सर्व समाजात कुलस्वामिनीला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याची जुनी परंपरा आहे. ही परंपरा मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांनी ‘छापा काटा’ चित्रपटात लग्नाच्या शुभ प्रसंगी देवदेवतांच्या आगमनासाठी जागरण गोंधळ मांडत जपली आहे.

मल्हारी मार्तंड आणि रूपसुंदरी म्हाळसा ते कारल्याच्या एकवीरा आईचा उदो उदो करणारं ‘आई तुझ्या नावानं गोंधळ मांडला’ गोंधळगीत ११ डिसेंबर २०२३ रोजी सर्व प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून अवघा महाराष्ट्र उत्साहाने झिंगणार असल्याचं दिसत आहे.
शशांक कोंडविलकर यांनी गीताला शब्दबद्ध केले असून गणेश सुर्वे यांनी उत्स्फूर्त संगीत दिले आहे. गौरव चाटी यांनी देवतांच्या भक्तीत सर्वांनी विलीन व्हावे असे स्वर या गीतास दिले आहेत. ‘छापा काटा’ चित्रपटाची निर्मिती श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केले आहे. येत्या १५ डिसेंबर २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना चित्रपटगृहात ‘आई तुझ्या नावानं गोंधळ मांडला’ या गोंधळगीताचा मनसोक्त आनंद लुटता येणार आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अखेर शेवगांव पोलीस स्टेशनमध्ये दोन शेअर ट्रेडिंगचे गुन्हे दाखल

प्रदीर्घ लढ्याला यश महेश हरवणे महाराज आणि शिसोदिया बंधु यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल विशेष …

विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबर त्यांचे संवर्धन करावे- निरीक्षक घनश्याम खराबे

बेलगाव येथे वृक्षारोपण व ११ हजार १११ विविध प्रजातींचे वितरण जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved