Breaking News

तथागत विद्यालय केसलवाडा येथे 67 वा महापरिनिर्वाण दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा)- सामाजिक न्यायासाठी,माणुसकीच्या हक्कासाठी अखेरपर्यंत लढणारे,दीनदुबळ्या दलितांचे कैवारी, जुलमी आणि ढोंगी समाजप्रथाविरुद्ध अविरत झगडणारे लढवय्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 67 वा महापरिनिर्वाण दिन दिनांक 6 डिसेंबर 2023 रोज बुधवारला पवनी तालुक्यातील तथागत विद्यालय केसलवाडा येथे साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पद्माकर सावरकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून भारतीय आदिवासी शिव शिक्षण संस्था गराडा चे जनरल सेक्रेटरी जयपालजी वनवे,नेवारे सर,बाबुराव निखाडे (सेवानिवृत्त शिक्षक) आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन वर्ग 10 च्या विद्यार्थिनींनी केले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन कुमारी श्रुती गजभिये ,योगिनी काटेखाये , खुशी वरखडे यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी कुमारी वेदिका गाडेकर, समर गायधने ,ज्योती निकुडे ,संघप्रिय वाहने, अलिषा रंगारी श्रुती मोटघरे धारवी शहारे, नव्या भानारकर आकांक्षा बावणे, आचल फुंडे, शर्वरी रामटेके आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.बाबुराव निखाडे सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर वागणारा विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी कसे ज्ञानग्रहण करावे यावर मुलांना संबोधित केले नेवारे सर यांनी डॉक्टर बाबासाहेबांचे समाजाप्रती कार्य यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुमारी श्रुती गजभिये हिने केले.कार्यक्रमाचे आयोजन अतिशय सुंदर प्रकारे वर्ग 10 च्या विद्यार्थिनींनी केल्यामुळे त्यांचे सर्वांनी कौतुक केले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक श्री.प्रदीप गोंडाने, कुमारी सुषमा गजभिये , प्रमोद गाडेकर व शिक्षकेतर कर्मचारी श्री.मधुकर पुरामकर, रामचंद्र आत्राम हे उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 2 : दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, …

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved