शेवगाव शहराचे ग्रामदैवत खंडोबा देवस्थान आणि सोनामीया वली दर्गा यांच्या यात्रा महोत्सवावर दंगलीमुळे झाला दूरगामी परिणाम
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव
शेवगांव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील वर्षीच्या यात्रा महोत्सवानंतर शेवगाव शहरांमध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वातावरण काही संघटना आणि राजकीय अति महत्त्वाकांक्षी व्यक्तींकडून केला गेला त्याचा परिणाम शेवगाव शहराचे ग्रामदैवत खंडोबा देवस्थान आणि हजरत सुनामी यावली दर्गा यांच्या यात्रोस्वार झालेला आहे गेल्या वर्षी खंडोबा देवस्थानच्या यात्रेमध्ये तमाशा मध्ये झालेला राडा हजरत सोनामीया वली दर्गा चे चादरीच्या मिरवणुकीमध्ये झालेलं गोंधळ त्यानंतर चार महिन्यांनी शेवगाव शहरामध्ये झालेली दंगल आणि दर महिन्यात पंधरा दिवसाला दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, अशा होणाऱ्या सातत्याने घटना यामुळे यंदा येत्या 24 डिसेंबर 3023 ला आणि 31 डिसेंबर2 023 ला साजरा होणाऱ्या यात्रा उत्सवावर परिणाम झालेला आहे.
शेवगाव शहरामध्ये काही भरकटलेले तरुण जाती-धर्माच्या नावाखाली शेवगाव शहर कायम अशांत कसे राहील याची चोख व्यवस्था करत आहे त्याकडे सुज्ञ नागरीक राजकारणी समाजसेवक आपापल्या सोयीप्रमाणे डोळे झाक करून घेत आहेत त्यामुळे या नतद्रष्ट लोकांचे भागले आहे कारण काहीही असो गेल्या काही महिन्यांपासून शहरात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे अबाल वृद्ध महिला सर्वसामान्य नागरिक व्यापारी आणि खेड्यापाड्यातून येणाऱ्या ग्राहकांमध्ये भीती निर्माण झाली आहे त्याचा परिणाम शेवगाच्या बाजारपेठेवर झाला आहे व्यापाऱ्यांना पूर्वीसारखे धंदे राहिले नाहीत शेजार पाजारच्या तालुक्यामधून शेवगाव शहरांमध्ये पाण्याची अडचण असताना सुद्धा घर बांधण्यासाठी लोकांची प्रथम पसंती असे परंतु अणेकांनी आपली पसंती बदलली असून शेवगाव शहरात येण्याचे टाळले आहे. याचे दूरगामी परिणाम येणाऱ्या पिढीला भोगावे लागतील बकाल झालेली बाजारपेठ गुण्यागोविंदाने नांदणारे समाज छोट्या मोठ्या कारणावरून लगेच हमरी तुमरी वर यायला लागले आहेत कुठे नेऊन ठेवला शेवगाव माझा असा प्रश्न पडला आहे
*ताजा कलम*
*शेवगाव शहराचे यात्रा महोत्सवामध्ये सर्व समाज गुन्ह्या गोविंदाने सहभागी होत असत याला शेकडो वर्षांची परंपरा आहे परंतु काही लोकांना गावकरी एकत्र असल्याचे चांगलं वाटत नाही खांडी भरवण्यात मोत्याची सवय लागलेल्या लोकांनी गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं अशी अवस्था शहराची करून ठेवली आहे आता किती वाटोळ झाल्यानंतर या लोकांना उपरत येणार आहे जुने जाणते राजकारणी सर्वसमावेशक नेतृत्व आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन शहर कसे शांत राहील याबाबत जोपर्यंत साधक वादक विचार होत नाही तोपर्यंत सर्वसामान्य शिवभक्त भया भीतच असेल असे चित्र सध्या दिसत आहे*
*विशेष बाब*
शेवगाव शहरातून डी.जे. आणि डॉल्बी कायमचे हद्दपार झाते भांडणाच मूळ कारण असलेल्या सार्वजनिक कार्यक्रमात डी. जे. अतिवापर आणि त्यावर वाजणारी वादग्रस्त गाणी हे भांडणाचा मूळ कारण होतं ना रहेगा बास ना बजेगी बासरी
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*