Breaking News

शेवगाव पाणी कृती समितीचा दणका मोडला ठेकेदाराला विरोध करणाऱ्यांचा मनका

शेवगाव शहराची नियोजित पाणीपुरवठा योजना अखेर अडथळ्यांची शर्यत पार करत उशिरा का होईना सुरु

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहराची रखडलेली नियोजित पाणीपुरवठा योजना सामाजिक कार्यकर्ते  माजी ग्रामपंचायत सदस्य प्रेमसुख जाजू यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण झालेली सर्वपक्षीय शेवगाव शहर पाणी कृती समिती  प्रशासक नगर परिषद शेवगाव तहसील कार्यालय शेवगाव प्रांत तथा प्रशासक कार्यालय पाथर्डी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर शेवगाव शहराची रखडलेली पाणी योजना परत सुरू करण्यासाठी शेवगावकर आक्रमक झालेले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेवगाव स्वाभिमानी शेतकरी संघटना शेवगाव प्रभाग क्रमांक सातच्या आणि इतर प्रभागातील महिला यांच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे  गेल्या मार्च 2023 पासून लाल फितीत अडकलेली शेवगा शहराची पाणी योजना पी.डब्ल्यू.डी. वनविभाग पाटबंधारे विभाग एम.जी.पी. { महाराष्ट्र जीवन प्राधिकरण } महावितरण कार्यालय नगरपरिषद शेवगाव च्या तांत्रिक विभागाची परवानगी अशा डझनभर अडचणींचा सामना करत इंद्रायणी इन्फ्रास्ट्रक्चर आणि कन्स्ट्रक्शन या संजय नागरगोजे यांच्या परळी येथील कंपनीला काम करण्याचा सुरू करण्याचा { कार्यारंभ } मुहूर्त मिळाला उद्या रविवार दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या खंडोबा माळ येथील जागेत जलकुंभ उभारणीच्या कामास सुरुवात होत आहे काही झारीतील शुक्राचार्य या योजनेत कायम अडथळा निर्माण करत होती “त्यांचे वाजले की बारा”

*ताजा कलम*

**काही लोकांनी शेवगाव शहरांमध्ये ठेकेदार बदलण्याचे अफवा पसरवल्या होत्या पैसा का नागपूर अधिवेशनामध्ये ठेकेदार बदलून टाकू अशा वर्गाना केल्या होत्या परंतु कर नाहीतर डर कशाला इंद्रायणी कन्स्ट्रक्शन ने सर्व अडथळ्यांची शर्यत शेवगावकरांच्या जनरेट यामुळे पार करत प्रत्यक्ष सर्व परवानगी मिळाल्या “काही नथीतून तीर मारणारे प्रशासनावर आमची किती घट्ट पकड आहे” अशा वल्गना करणारे, “तोंडात बोट घालून गंमत पाहण्याशिवाय” पर्याय राहिला नाही “मी नाही त्यातली आणि लुडबुड नगरपालिकेतली” जिल्हाधिकाऱ्यांच्या एका आदेशाने पंधरा दिवसात काम सुरू झाल्याने “प्रशासनातील झारीतील शुक्राचार्य सुद्धा झाले गार”*

*विशेष बाब*

*पाणी कृती समितीने विचारले फक्त तीन प्रश्न 1) वर्क ऑर्डर होऊनही काम का सुरु झाले नाही 2) प्रशासकीय परवानग्या का नाही मिळत 3) नियोजित योजना डिसेंबर 2024 पूर्वी पूर्णच झाली पाहिजे आणि काम तमाम*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved