जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर शहरातील दुर्गा किराणा दुकानाचे मालक विलास चंदनखेडे यांचा ८,७७२९० सुगंधीत तंबाखू जप्त केला आहे हि कारवाही २२ शुक्रवार दुपारी १२:३० सुमारास करण्यात आली आहे. बऱ्याच वर्षापासून विकास चंदनखेडे वय ५० प्रगती कॉलनी चिमूर हे आपल्या किराणा दुकानात सुगंधी तंबाखू विक्री करत होते, फिर्यादी च्या गुप्त माहितीनुसार फिर्यादी गिरीष त्रिम्बकराव सातकर, व आर बी यादव अन्न सुरक्षा अधिकारी, नागपूर कलम- 328, 188, 273 फूड अँड ड्रग अन्न सुरक्षा अधिकारी यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून साई नगर येथे छापा टाकला असता उभे असलेल्या मारोती व्हॅन सुपर कॅरी, रंग लाल, MH 27 BX 4610 या गाडीत सुगंधित तंबाखू माल मिळाले असून कारवाई करण्यात आली.सदर कारवाई अन्न व औषध सुरक्षा अधिकारी व पो नी मनोज गभणे, सपोनि निलेश चवरे, PC शंकर बोरसरे,अमोल नन्नावरे यांच्या पथकाने केली आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलीसाची शोध मोहीम सुरू आहे.