Breaking News

संडे स्पेशल दणका शेवगाव नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचा मोडला मनका

*शेवगाव शहरात बाजारपेठेत गटारीचे पाणी रस्त्यावर*

*व्यापारी आणि ग्राहकांचे आरोग्य धोक्यात नगरपरिषद च्या “आरोग्य विभागाच आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातय” कारभार*

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव  9960051755

शेवगाव:- शेवगाव शहरातील गजबजलेल्या शिवाजी चौक जैन गल्ली कापड बाजार व नवी पेठ मोची गल्ली या भागातील तुंबलेल्या गटारी फुटलेले चेंबर ड्रेनेजची शून्य व्यवस्था यामुळे या भागात कायम रस्त्यावर चिखल व राडाराडा पडलेला असतो निर्माण आधीन असलेले बांधकामे त्यामुळे तुंबलेल्या गटारी फुटलेले चेंबर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे कायमची दुर्लक्ष शेवगाव शहराचा मुख्य कापड बाजार अर्बन बँक जैन गल्ली व नाईकवाडी मोहल्यात जाणारी येणारी वाहतूक बोची गल्लीतील पोरवाल सर आणि पवार कॉम्प्लेक्स या ठिकाणी कायम साचलेली घाण यामुळे परिसरातील व ये जा करणारे अबाल वृद्ध महिला बालक कायम पाय घसरून या घाणीत पडत असतात गटारीच्या दुर्गंधीमुळे या भागातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

निकृष्ट दर्जाच्या अंडरग्राउंड गटारीची कामे आणि जैन गल्ली या भागातील रस्त्यांचे न झालेले काम हा या परिसरातील रहिवाशांचा गंभीर प्रश्न आहे.आमदार निधीतून शहरामध्ये लाखो रुपयांची कामे सुरू असताना या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचे कायम दुर्लक्ष होताना दिसत आहे या भागात सत्ताधारी पक्षाचे अनेक वजनदार नेते राहत असताना सुद्धा त्यांनी सुद्धा डोळे झाक केल्याची दिसत आहे.

*ताजा कलम*

शेवगाव शहरातील एकुलती एक मुतारी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पोतनीस हॉस्पिटलच्या मागील बाजूची सार्वजनिक मुतारी बाजारपेठेतील एकुलती एक असून तिच्या स्वच्छतेचे जणू नगरपरिषद शेवगाला वावडेच आहे पाण्याची व्यवस्था नाही पालिकेकडे शेकडो सफाई कामगार असून सुद्धा या भागातून जाणाऱ्या महिला आणि बालकांना उलटी होईपर्यंत मळमळ होत असते या भागातील व्यापाऱ्यांची कमाल आहे एवढ्या दुर्गंधी भरलेल्या परिसरामध्ये रात्रंदिवस कसा वावर करतात नगर परिषदेच्या आरोग्य विभागाला जागेल तेव्हा या परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहील

*विशेष बाब*

*घनकचऱ्यावर कोट्यावधी रुपये खर्च करणार नगरपालिकेकडे अतिरिक्त मनुष्यबळ असताना सुद्धा शहरातील या प्रमुख चौकामधील स्वच्छतेबाबत अनास्था का आहे हा एक सर्वसामान्य सेवाकरांना पडलेला प्रश्न आहे*

*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved