Breaking News

सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांसाठी मनसेकडून मानधन सुपूर्द

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मालवण:-मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिराच्या पूजा अर्चा, कार्यक्रम व देखभाली साठी शासनाकडून ६ हजार रुपयांचे तुटपुंजे मानधन दिले जाते.अनेक लोकप्रतिनिधीनी यासाठी निधी देण्याची दिलेली आश्वासने हवेतच विरली आहेत.

त्यामुळे यासाठी मनसेने पुढाकार घेऊन शिवराजेश्वर मंदिराच्या पूजाऱ्यांसाठी २५ हजार रुपयाचे मानधन मंदिराचे पुजारी सयाजी सकपाळ यांच्याकडे सुपूर्द केले असून दरवर्षी मनसेकडून शिवराजेश्वर मंदिरासाठी वाढत्या पटीत मानधन देण्यात येणार आहे,अशी माहिती मनसेचे सिंधुदुर्ग पक्ष निरीक्षक आणि मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस श्री संदीप दळवी यांनी मालवण येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून …

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved