Breaking News

जिल्ह्यातील नागरिकांनी संत गाडगे महाराजांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवावे- प्रदिप काटेखाये

गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त दिनदर्शिकाचे विमोचन

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा)- डेबूजींच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणा पासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोड जेवण महत्वाचे होते. गावात कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्यातोंडी गावकर्‍यांना शिकवित होते. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडी, फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्‍न केले. म्हणुन जिल्ह्यातील नागरिकांनी संत गाडगे महाराजांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवावे असे प्रतिपादन सेवानिवृत्त केंद्र प्रमुख प्रदिप काटेखाये यांनी केले.

महाराष्ट्र न्युज सर्विस व समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्यूकेशन सेंटर, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराज‌ यांची ६७ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली तसेच त्यानिमित्त २०२४ या वर्षाच्या दिनदर्शिकाचे विमोचन छोटा बाजारातील हनुमान मंदिरात करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव अविल बोरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त केंद्र प्रमुख प्रदिप काटेखाये, समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्यूकेशन सेंटर चे संचालक समीर नवाज, विनोद केळझरकर, सामाजिक ‌कार्यकर्ते प्रशांत श्रावणकर, लक्ष्मी केळझरकर, मनिषा श्रावणकर, सामाजिक ‌कार्यकर्ते विलास केजरकर,लोकस्वराज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष किसन शेंडे, खोकरला पतंजलि योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराज‌ यांच्या पुर्णाकृती प्रतिमेला मार्ल्यापण करुन गाडगे महाराज यांची ६७ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. तसेच त्यानिमित्त २०२४ च्या दिनदर्शिकाचे विमोचन करण्यात आले.

गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावात भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय व सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते.त्यांनी अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा विरोध, कीर्तनाव्दारे लोक जागृती. चोरी करू नका, कर्ज काढू नका, व्यसनाच्या अधीन होऊ नका. देवा-धर्माच्या नावाने प्राण्यांची हत्या करू नका, अस्पृश्यता पाळू नका. कीर्तनातून लोकजागृती. महाराष्ट्र समाजाचे व्यासपीठ स्वच्छता, प्रामाणिकपणा यावर भर दिला. देव दगड-धोंडयात नसून माणसात आहे. असे सांगत लोकांना जागृत केले. तरी सुध्दा त्यांचे विचार जोपासणे गरजेचे आहे असे मत ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव अविल बोरकर यांनी व्यक्त केले.

गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाज सुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय आणि सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. त्यांना अस्वछता बघून खूप वाईट वाटे. त्यामुळे कीर्तनाच्या निमित्ताने जिथे जिथे जात तिथे प्रथम झाडू मागवून घेत आणि गाडगेबाबा व त्यांचे अनुयायी स्वत: हातात झाडू घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ करीत आणि मगच कीर्तनाला सुरुवात करीत. अशा या महान पुरुषाने राबविलेल्या मोहिमेची दखल आपल्या राज्य-शासनाला घ्यावी लागली. त्यांच्या नावाने ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान’ राज्यस्तरीय मोहीम कार्यरत आहे.असे विचार सामाजिक ‌कार्यकर्ते विलास केजरकर यांनी मांडले.

तसेच गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला. “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला“ हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते. आचार्य अत्रे गाडगेबाबां बद्दल म्हणतात ‘सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात‘
असे अत्रेनी व्यक्त केले ते योग्य आहे असे समीर नवाज यांनी सांगितले आहे.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सुनिल डोंगरे, हिना मानापुरे, सुवर्णा कोल्हटकर, सकुंतला कान्हेकर, दिलीप कोल्हटकर, दुर्गा चटप इत्यादींनी सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 2 : दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, …

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved