Breaking News

शेवगाव शहराचे ग्रामदैवत खंडोबा देवाचा यात्रा महोत्सव थाटात संपन्न

भाविक भक्तांचा प्रचंड प्रतिसाद अबाल वृद्ध महिला यांनी घेतला मनमुराद आनंद

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 27 डिसेंबर 2023 मंगळवार

शेवगाव:- शेवगाव शहराचे ग्रामदैवत खंडोबा महाराज देवस्थान यात्रा चंपाषष्ठी नंतर भागवत सप्ताहाचे आयोजन करून सुरुवात झाली त्यानंतर शनिवारी रात्री युवकांनी कावडीने पाणी आणून देवाला स्नान घातले रविवारी रात्री पारंपारिक वाद्य वाजवून गणपती मंदिर क्रांती चौक येथून मानाची छत्री घोड्यावरून मिरवणूक काढून आतषबाजी करत देवाची मानकऱ्यांच्या हस्ते यांच्या हस्ते पूजा करण्यात आली धनगर समाजाच्या पंच कमिटीचे अध्यक्ष  छबुराव मिसाळ पंच कमिटी सदस्य  लक्ष्मण भिसे मामा,  शिवाभाऊ तोतरे,  गणेश कोरडे यांच्यासह यात्रा पंच कमिटी यांनी यात्रा महोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी गेले महिनाभर प्रयत्न केले ग्रामदैवताच्या दर्शनासाठी शहरासह पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी गर्दी केली होती रविवारी भाजी बाजार खेळणी आणि संसार उपयोगी साहित्याची दुकाने मनोरंजन पर खेळण्याची आनंद नगरी खाऊ गल्ली यामुळे शहरातील आबालवृद्ध यांनी मनमुराद आनंद घेतला.

*ताजा कलम*

*यंदा यात्रा पंच कमिटीने लोकवर्गणी न केल्यामुळे सालाबाद प्रमाणे रविवारी येणारे तमाशाचे फड सोमवारी होणारा आर्केस्ट्रा आणि मंगळवारी होणारा जंगी हंगामा यापासून शेवगावकर वंचित राहिले परंतु शेकडो वर्षांची परंपरा असलेली यात्रा खेळीमेळीच्या वातावरणात पारंपरिक पद्धतीने पार पडली*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अखेर शेवगांव पोलीस स्टेशनमध्ये दोन शेअर ट्रेडिंगचे गुन्हे दाखल

प्रदीर्घ लढ्याला यश महेश हरवणे महाराज आणि शिसोदिया बंधु यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल विशेष …

विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबर त्यांचे संवर्धन करावे- निरीक्षक घनश्याम खराबे

बेलगाव येथे वृक्षारोपण व ११ हजार १११ विविध प्रजातींचे वितरण जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved