Breaking News

जिल्हाधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रांवरील सुविधांची पाहणी चंद्रपूर व मूल तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर दि. 30:-आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज चंद्रपूर व मूल तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट देवून मतदार नोंदणी प्रक्रीयेचा आढावा घेतला.जिल्हाधिकारी गौडा यांनी चंद्रपूर विधानसभा मतदार क्षेत्रातील मतदान केंद्र क्रमांक 129 व 131 तसेच मूल येथील मतदान केंद्र क्रमांक 102 व 103 येथील मतदान केंद्रावरील सुविधांचे निरिक्षण करून आवश्यक किमान सुविधा उपलब्ध करण्याचे व या कामात येणाऱ्या अडचणींबाबत अहवाल देण्याचे सांगितले.

याप्रसंगी त्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून मतदाराचे छायाचित्र व नावांची अचूक नोंदणी होत आहे का याबाबत भौतिक पडताळणी करून खात्री करण्याच्या सूचना दिल्या व पात्र व्यक्ती मतदार नोंदीपासून वंचित राहू नये व मतदार यादी अचूक करण्याचे निर्देश त्यांनी दिले.जिल्हाधिकारी गौडा यांचेसोबत, सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., तहसीलदार विजय पवार नायब तहसीलदार किशोर साळवे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 2 : दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, …

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved