Breaking News

जिल्ह्यातील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावे – मोहन बरबडे

ग्रंथोत्सव 2024 कार्यक्रमात मार्गदर्शन

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा)- रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही भारताच्या इतिहासातील क्रांतीकारक घटना आहे. शिवराज्याभिषेक ही मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील स्वातंत्र्याची एक पहाट आहे. तसेच शिवाजी महाराजांनी दीर्घकाळ केलेल्या संघर्षाची एक ठोस व निश्चित अशी फलश्रुती आहे. शिवाजी महाराजांचे चरित्र हे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणारे आहे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक हा भारतीय इतिहासातील एक सुवर्णक्षण आहे. म्हणून जिल्ह्यातील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवावे असे प्रतिपादन व्याख्याते तथा ज्येष्ठ इतिहास अभ्यासक मोहन बरबडे यांनी केले.

ते उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण अंतर्गत रेल्वे मैदान खात रोड येथे भंडारा ग्रंथोत्सव 2024 ग्रंथ प्रदर्शन व विक्री कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक- भारतीय इतिहासातील एक सुवर्णक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते.छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक- भारतीय इतिहासातील एक सुवर्णक्षण कार्यक्रमाचे व्याख्याते ज्येष्ठ इतिहास अभ्यासक मोहन बरबडे हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभ्यासक डॉ.सुमंत देशपांडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्हॉईस ऑफ मिडीया, महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर परसावार, नागपूरचे सहाय्यक ग्रंथालय संचालक रत्नाकर चं. नलावडे, नारायण नागलोथ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.ह्यावेळी उपस्थित मान्यवरांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवचरित्र ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आले.

देशातील लोकशाही व स्वातंत्र्य मजबूत राखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले- आंबेडकर, संत व समाजसुधारकांच्या विचारांची पताका उंचावत ठेवण्याची आज खरी गरज आहे, मात्र सध्या सोयीनुसार शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर तोही भावनिक अंगाने करणे सुरू आहे. इतिहासपुरूषांचे इतक्या मोठ्या प्रमाणात दैवतीकरण करण्यात येत आहे, आणि त्यांची चिकित्सा करता येणेही मुश्कील होऊ लागले आहे. ठराविक मुद्दे हायलाईट करायचे व इतर मुद्दे झाकून ठेवायचे असा प्रकार सुरू आहे. म्हणून महापुरूषांचे विचार जिवंत ठेवायचे असतील तर तरूण पिढीने केवळ सोशल मीडियावर अवलंबून न राहाता ऐतिहासिक संदर्भग्रंथ व पुस्तकांचे वाचन करावे असे मत व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर परसावार यांनी केले.

जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थींनी, वाचकवर्ग, नागरिक व मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रंथोत्सव प्रदर्शनी व विक्री कार्यक्रमाचा लाभ घ्यावे. प्रत्येकांच्या घरात‌ तसेच जिल्ह्यामधील प्रत्येक गावात सार्वजनिक वाचनालय आहेत . त्यामध्ये थोर विचारवंत तसेच क्रांती घडवून आणणाऱ्या महान व्यक्तींचे ग्रंथ असावे असे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सुमंत देशपांडे यांनी व्यक्त केले.त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज व आई जिजाऊच्या जिवन चारित्र्यावर विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थींनी, वाचकवर्ग, नागरिक व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकूंदा ठवकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. रत्नाकर नलावडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनुरथा निनावे, धनश्री राऊत, घनश्याम कानतोडे, महेश साखरवाडे, ईस्तारी मेंढे, राजकुमार हटवार, प्रदीप रंगारी, विकास गोंधूळे, काका भोयर, सुरेश फुलसुंगे, चंद्रशेखर खोब्रागडे, कृष्णा चिंचखेडे, पी. आर. दर्शनवार, विकास निमकर, सलमा क्रिष्णा चिंचखेडे, शारदा बनकर, अंतिमा तितीरमारे, राघवी वैद्य, प्राची पुडके, शितल चिंचखेडे, प्रविण मोहरिल, स्नेहा पुडके, किरण मेश्राम, उषा वालदे दिलीप मडावी तसेच जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, ग्रंथपाल आणि विविध शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थींनी, वाचकवर्ग, नागरिक, शिक्षक -शिक्षिकांनी सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

कृपया लक्ष द्या – हरवले आहेत

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव शेवगाव:-गेल्या पंधरा दिवसापासून राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता पायी घराबाहेर …

14 मे पर्यंत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी

नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved