Breaking News

स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपट आता अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर

मुंबई-राम कोंडीलकर

मुंबई:-आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना एकमेकांशी बोलायला वेळ मिळत नाही. ऋतुराज धलगाडे दिग्दर्शित ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपटाने आयुष्यात एकटेपणा जाणवणाऱ्या लोकांना त्यांच्या जीवनातील आनंदाचे क्षण शोधण्यासाठी प्रेरित करण्याचा सुंदर संदेश दिला आहे. ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपट १ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावण्याचे दु:ख लोक उराशी बाळगून असतात, कुटुंबापासून दूर राहणाऱ्या लोकांना एकटेपणा जाणवतो. अशा लोकांच्या आयुष्यातील संवादाचा दुरावा भरून काढण्यासाठी मानस, नैना, मारुती आणि श्रीरंग काका हे चार लोक ‘ॲंटी लोनलीनेस प्रोग्राम’ सुरू करतात, लोकांच्या जीवनातील एकटेपणाची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करतात. पण प्रोग्राम यशस्वी ठरेल की नाही हे चित्रपटात पहायला मिळणार आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मातृतिर्थ सिंदखेड राजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. च्या शेकडो गुंतवणूकदारांना आधी मी कमवीन मग तुमचे पैसे फेडील

मातृ तीर्थ सिंदखेडराजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ज्या त्या मुख्य संचालकाचे सोशल मीडियावर गुंतवणूक दारांना थांबा …

भिलेवाडा येथे संस्कार शिबिरात अंधश्रद्धेवर प्रात्यक्षिके व मार्गदर्शन

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- येथून ४ किमी अंतरावर असलेल्या भिलेवाडा येथील दादाजी धुनिवाले मठात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved