Breaking News

एस्पायर होम फायनान्स कंपनी विरोधात आणि इतर तहसिलदारांकडे तक्रारी निवेदनाद्वारे कर्जदारांनी पठाणी वसुली थांबण्याची मागणी

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव
( सामाजिक कार्यकर्ता — पत्रकार )

शेवगाव : -फायनान्स कंपनीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात कर्जदार एकत्र येऊन शेवगावच्या तहसीलदारांकडे दाद मागितली आहे अहमदनगर जिल्ह्यात सुमारे सहाशेहून अधिक कर्जदार या कंपनीच्या विरोधात असून आर्थिक स्वरूपाच्या मनमानी कारभाराच्या तक्रारी दाखल झाल्या आहे. घेतलेली रक्कम त्याच्या दुप्पट पैसे भरूनही मूळ कर्ज त्यापेक्षाही अधिक रक्कम खाजगी कंपनी कर्जदाराच्या माथी मारत आहे. या खाजगी कंपनीने नेमलेले वसुली अधिकारी व गुंड प्रवृत्तीचे लोक शेवगावात दाखल होऊन पठाणी पद्धतीने वसुलीचा तगादा लावत आहे.या कर्जदारांची लायकी काढण्याची भाषा हे वसुलीचे प्रतिनिधी बोलत आहे.तुमचे घर खाली करा…तुमच्या घराचा निलाव झाला आहे.. आम्ही घराची जप्ती करायसाठी आलो आहे. मात्र हे फायनान्स कंपनीचे अधिकारी कोणतीही सूचना न देता मनमानी पद्धतीने आमच्यावर आर्थिक बोजा टाकल,कर्जाची रक्कम भरून व्याजही भरले मात्र कर्जाच्या दुप्पट रक्कम आकारण्याची मनमानी भाषा या कंपनीची असून जोर जबरदस्तीने घर जप्ती करण्याचा अमानुष प्रकार यांच्याकडून होत आहे. आम्ही जप्तीबाबत कायदेशीर बाबी पुर्ण केले आहे. असे खोटी माहिती देऊन कर्जदारांची फसवणूक फायनान्स कंपनी करीत असल्याचा आरोप कर्जदारांनी करत तहसील कार्यालय गाठले तहसीलदारांची भेट घेतली.

अनेक कर्जदारांनी कंपनीच्या आर्थिक कारभाराबाबत पाढा वाचला त्यानंतर तहसीलदार यांनीही या सर्व गोष्टीची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल सांगितले एस्पायर होम फायनान्स कंपनीकडून आम्ही कर्ज घेतले होते. त्या कंपनीचे मोतीलाल ओसवाल होम फायनान्स विलनीकरण झाले असून आता ती फायनान्स कंपनी कर्जदारावर अव्वाच्या सव्वा कर्जाची रक्कम आमच्यावर टाकून वसुली करतात, कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर पठाणी वसुली करणारे गुंड जबरदस्ती करून महिला व घरातील आबालबुद्ध यांच्याशी बेकायदेशीरपणे वागतात कर्जापोटी आम्ही गहाण दिलेली स्थावर मालमत्ता याची कुठलीही कायदेशीर बाबी पूर्णपणे न करता ही हे मालमत्ता जप्त कर करत आहे. यांच्या या मनमानी कारवांमुळे अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत आम्हालाही आता आत्महत्या करण्याची वेळ आमच्यावर या फायनान्स कंपनीने आणले आहे यावर प्रशासनाने लक्ष देऊन तोडगा काढावा अन्यथा आम्हाला वेगळे पाऊल उचलावे लागेल असा इशारा यावेळी कर्जदारांनी दिला आहे यावेळी प्रवीण बरबडे, अरुण वैद्य, जालिंदर चेडे, मयुर ढाणके, अक्षय खोमणे ,डॉ देविदास धावणे, दिलीप राजळे,सादिक शेख,नितीन शिंदे, गमे,असिफ पठाण, प्रवीण शिरोडकर,सुहास वेताळ यांचं शेकडो कर्जदार यावेळी उपस्थित होते.इन्स्पायर होम फायनान्स कंपनी आणि सध्याचे असलेली मोतीलाल ओसवाल होमफायनान्स कंपनी णे सुद्धा ग्राहकांना त्रास दिला आहे

*ताजा कलम*

*या कंपनी विरोधात शेवगाव पोलीस निरीक्षक, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्याकडे वेळोवेळी या कर्जदारांनी तक्रार दाखल केली आहे मात्र यावर कोणताही तोडगा या अडचणीत असलेल्या कर्जदारांना निघालेला नाही*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

त्या दोन लीडरला गुंतवणूकदारांनी दिला चौप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या वादात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या …

युवकाचे प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली

*तालुक्यातील हातगाव येथील नागेश बंडू गलांडे वय २४ रा हातगाव हा गायब झालेल्या युवकाचे प्रेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved