Breaking News

शिव मावळे ग्रुप तर्फे अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत “श्री छत्रपती शिवाजी महाराज” जयंती मोठ्या उत्साहात साजरी

विशेष प्रतिनिधी-नागपूर

नागपूर:-आज दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी वार सोमवार शिव मावळे ग्रुप तर्फे अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत “श्री छत्रपती शिवाजी महाराज” जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज शिवव्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख शिवव्याख्याते प्रा. आनंद मांजरखेडे सर यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास उत्कृष्टपणे मांडला. आजच्या काळात महाराजांची गरज काय त्यांच्या विचारांची गरज काय या संदर्भात मांजरकडे सरांनी आपल्या उत्कृष्ट अशा प्रभुत्व शैलीच्या जोरावर शिवव्याख्यानाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉक्टर लक्ष्मी डाखोडे मॅडम सहाय्यक प्राध्यापक यांनी शिव मावळे ग्रुप ला मोलाचे मार्गदर्शन करून उत्कृष्ट कर्या करीता शुभेच्छा दिल्या.

*”हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता,
अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता, असा जिजाऊंचा शिवबा लाखात नाही, तर जगात एक होता”
कार्यक्रमाचे संचालन प्रा. निलेश सोनटक्के सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता शिव मावळे ग्रुपचे अध्यक्ष राकेश सोनटक्के, उपाध्यक्ष राहुल टाले सचिव लक्ष्मीकांत धोपटे, रोहित साठवणे, गोपाल हेडाऊ, मेघनाथ बेंद्रे, प्रगती साभारे, साक्षी बावनकुळे, अंजली रामटेके, स्वप्निल सोनवणे, दिनेश भोयर, विशाल ठमके, संकेत घरदे, ई. आणि सर्व शिव मावळे ग्रुप.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मालवाहू गाड्यामुळे बाजार पेठेतील रहदारीस अडथळा-नगरपरिषदेचे दुर्लक्ष

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरातील टिळक वॉर्ड येथील जुनी व मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या …

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved