Breaking News

शेवगाव पोलिसांची धडक कारवाई दहा क्विंटल चोरीचा कापूस आणि चोरीचे वाहन रात्रीस गस्तीस असलेल्या पोलिसांनी पकडले चार संशयित आरोपी अटक दोन फरार

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-शेवगाव शहरामध्ये रात्रीच्या गस्तीस असलेले पीएसआय नीरज बोकील आणि त्यांचे सहकारी दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी नाईट राउंड चालू असताना मध्यरात्री पो. हे. का. बडे हे. का. संतोष वाघ होमगार्ड मतीन बेग पैठण रोडच्या अन्नपूर्णा जिनिंगच्या संरक्षक भिंतीजवळ चार ईसम संशयास्पद रित्या फिरताना गस्ती पथकास आढळल्याने अन्नपूर्णा जिनिंग चे मॅनेजर यांना फोनवरून माहिती दिली असता त्यांनी जिनिंग परिसरात चक्कर मारली असता चोरटे गोण्यामध्ये कापूस भरताना आढळे त्यांना खिशातील रामपुरी टॉमी चा धाक दाखवून शांत बस नाहीतर तुझा जीवच घेऊ अशी धमकी मुजीब शेख यांना दिली.त्यांनी आरडा ओरडा केल्याने त्यांच्या दिशेने टॉमी फेकून मारली परिसरातील इतर कामगार उठल्याने आरडाओरडा झाल्याने चोर साहित्य तेथेच टाकून पळून गेले पैठण रोडला जास्तीत असलेल्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला चोरट्यांचा पाठलाग करताना काही अंतरावर पांढऱ्या रंगाची पिकअप व्हॅन व मोटरसायकली आढळून आली.

पिकप यांमध्ये कापसाने भरलेल्या गोण्या व भोत आढळून आले पोलिसांनी चार आरोपींना शिताफीने पकडले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांची नावे पुढील प्रमाणे 1) भानुदास बाबुराव गायकवाड 2) राजू दादा बर्डे दोन्ही राहणार देऊळगाव राजा हल्ली मुक्काम बारस्करवाडी शेवगाव 3) विवेक योगराज पाटील राहणार लासलगाव तालुका पाचोरा जिल्हा जळगाव हल्ली मुक्काम भारस्करवाडी शेवगाव 4) किरण कचरू मोहिते राहणार मगर वस्ती शेवगाव अंधाराचा फायदा घेऊन काट्याकुपट्यातून पळून गेलेल्या दोन आरोपींची नावे 5) संदीप वाघमारे शेवगांव 6) बळीराम फुगे राहणार जालना अशी फरार झालेल्या आरोपींची नावे आहेत तरी घडलेल्या प्रकाराबाबत अन्नपूर्णा जिनिंग चे मॅनेजर मुजीब महबूब शेख राहणार नायकवाडी मोहल्ला यांनी शेवगाव पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीनुसार गु. रजि. नं. 169/2024 नुसार भा. द. वि. कलम 395, 506 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पो.स. ई. नीरज बोकील हे करत आहेत.

*ताजा कलम*
*अलीकडच्या काळात शेवगा शहरामध्ये चेन सन्याचिंग रस्ता लूट व दरोडे चे प्रकार वाढल्यास यामुळे शेवगा शहर पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे मध्यंतरी शेवगाव शहराच्या भरवस्तीत सार्वजनिक वाचनालयाच्या समोर चार ते पाच टपऱ्या फोडण्यात आल्या होत्या शेवगाव शहरात पोलिसांची गाडी पुढे आणि चोर त्यांच्या मागे अशी अवस्था झाली आहे*

*क्रमशः*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यजार्त पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

त्या दोन लीडरला गुंतवणूकदारांनी दिला चौप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या वादात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या …

युवकाचे प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली

*तालुक्यातील हातगाव येथील नागेश बंडू गलांडे वय २४ रा हातगाव हा गायब झालेल्या युवकाचे प्रेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved