Breaking News

मातृतीर्थ सिंदखेडाराजा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी चा संचालक फरार

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव  9960051755

शेवगाव:-शेवगाव शहरातील कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेल्या व अधिक परतव्याचे आमिष दाखवून शेवगावकरांना कोट्यवधी रुपयांना गंडवलेल्या नेवासा रोड लगत २-३ तीन महिन्यापूर्वी मातृतीर्थ सिंदखेडाराजा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. शाखा चालू करून कमी वेळेत अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून बँकेचा संचालक चव्हाणने पूर्ण नाव माहित नाही कोट्यवधी रुपये घेऊन पोबारा केला आहे.मोठ्या थाटामाटात ओपनिंग करण्यात आलेली निधी बँकेने फसवणूक केल्यामुळे शेवगांवकरांच्या पायाखालची जमीन सरकली आहे,दरम्यान, मातृतीर्थ सिंदखेडाराजा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. ने इतर बँकेपेक्षा जास्तीचे व्याज देण्याचे आमिष दाखवून एजंट मार्फत नागरिकांची दिशाभूल करून करोडो रुपयांच्या एफ.डी. करून घेतल्या.

पण जेव्हा काही नागरिक एफ.डी. ब्रेक करण्यासाठी गेले असता संबंधित शाखेत पैसेच नाही. अशी बतावणी करून पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली.तेव्हा फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला. अवघ्या तीन महिन्याच्या आताच बँकेने गाशा गुंढाळून करोडो रुपयांची शेवगांव करांची फसवणूक करून संचालक चव्हाण अजूनही फरारच आहे. तरी अशी भामटेगिरी करणाऱ्यां वर सरकारी संबंधित यंत्रनेचे लक्ष कसे काय जात नाही ? हा मोठा प्रश्न निर्माण होतो. आर. डी. एम. मध्येही करोडो अडकले आर डी एम एक्सचेंज हे ऑनलाईन पद्धतीने आलेले डॉलर भारतीय चलनात रूपांतर करून नागरिकांच्या बँक खात्यात जमा होत होते,परंतु तेही अवघ्या काही महिन्यातच बंद पडले. त्यातही राज्य भरातील नागरिकांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत.

*ताजा कलम*

*ज्यांचे ज्यांचे पैसे अडकले आहेत त्यांनी आ. बी. आय. आयकर विभाग आणि ई. डी. { सक्त वसुली संचालनालय } कडे रीतसर तक्रार करून या भामट्या लोकांना धडा शिकवावा.*

अविनाश देशमुख शेवगांव
पत्रकार सामाजिक / कार्यकर्ता

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अशैक्षणिक आणि ऑनलाईन कामाने शिक्षक त्रस्त : सुरेश डांगे

सेवानिवृत्तीनिमित्त रावन शेरकुरे आणि प्रमोद मायकुरकर यांचा शिक्षक भारतीतर्फे सत्कार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भावी पिढी …

मातृतिर्थ सिंदखेड राजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. च्या शेकडो गुंतवणूकदारांना आधी मी कमवीन मग तुमचे पैसे फेडील

मातृ तीर्थ सिंदखेडराजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ज्या त्या मुख्य संचालकाचे सोशल मीडियावर गुंतवणूक दारांना थांबा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved