Breaking News

ॲडव्हान्टेज चंद्रपूर ‘इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे 4 मार्च रोजी उद्घाटन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे व उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा प्रशासन आणि एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘ॲडव्हांटेज चंद्रपूर 2024 – इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे उद्घाटन सोमवार दि. 4 मार्च रोजी होणार आहे.चंद्रपूर वन अकादमी येथे सकाळी 11 वाजता होणा-या या कार्यक्रमाला केंद्रीय रस्‍ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्‍थ‍िती राहणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार राहतील.

पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्‍या ‘अॅडव्‍हांटेज चंद्रपूर 2024’ ला उद्योग मंत्रालय, महाराष्ट्र सरकार आणि एमएसएमई मंत्रालय, भारत सरकारचे सहकार्य लाभले आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे सामर्थ्य प्रदर्शित करतानाच या जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देणे, पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळाच्या बाबतीत चंद्रपूर आणि आसपासच्या प्रदेशाच्या मागासलेपणाबद्दलचे गैरसमज दूर करणे आणि उद्योग तज्ञांचे मार्गदर्शन देऊन स्थानिक व्यवसाय, उद्योजक, गट यांना सहाय्य करणे ही या आयोजनामागची प्रमुख उद्दिष्टे आहे.

विविध सत्रांचे आयोजन : दि.4 मार्च रोजी वन अकादमी येथील प्रभा सभागृहात दुपारी 2.30 वाजता ‘आर्यन अँड स्‍टील’ विषयावर तर दुपारी 4.30 वाजता ‘मायनिंग अँड कोल’ विषयावर तसेच सिद्धांत हॉलमध्‍ये दुपारी 2.30 वाजता ‘अल्‍टरनेटीव्‍ह एनर्जी सोर्सेस’ या विषयावर आणि दुपारी 4.30 वाजता होणा-या ‘अॅग्रीकल्‍चर अँड अलाइड सेक्‍टर्स’ या विषयावर चर्चासत्र आयोजित आहे.

5 तारखेला प्रभा हॉलमध्‍ये सकाळी 10.30 वाजता ‘एफआयडीसी अँड बांबू’ व दुपारी 12.30 वाजताच्‍या ‘बांबू इंडस्‍ट्री’ या विषयावर, दुपारी 3.00 वाजता ‘एज्‍युकेशन अँड स्‍कील डेव्‍हलपमेंट’ या विषयावर, सिद्धांत हॉलमध्‍ये सकाळी 10.30 वाजता ‘फायनान्‍स अँड स्‍टार्टअप’ दुपारी 12.30 वाजता ‘सर्क्‍युलन इकॉनॉमी’ वर तर दुपारी 3.00 वाजता होणा-या ‘सिमेंट अँड लाईमस्‍टोन’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. सायंकाळी 6.30 वाजता विपिन पालिवाल यांचे मोटिव्‍हेशनल टॉक होईल.या मेगा एक्स्पोला महाराष्ट्र आणि उर्वरित भारतातून तसेच परदेशातील व्यापारी, उद्योगपती, उद्योजक, नोकरी-उत्सुक, एमएसएमई, व्यवसाय, उद्योग तज्ञ आदींची उपस्‍थ‍िती राहणार आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

श्रीमती विद्या गाडेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ओ. बी. सी. सेलच्या प्रदेश सचिव पदावर निवड सौ. सुनंदा राजेंद्र पवार यांच्या हस्ते बारामती येथे नियुक्तीपत्र प्रदान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव  9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर …

त्या दोन लीडरला गुंतवणूकदारांनी दिला चौप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या वादात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved