Breaking News

राष्ट्रीय महामार्गावर ट्रक-ट्रॅक्टरचा अपघात

एकाचा अपघातात जागीच मृत्यू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर/चिमूर:-शेडेगाव मध्ये ट्रक व अवैध वाळू वाहतूक ट्रॅक्टरचा अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टरचा मजूर जागीच गतप्राण झाला आहे हा अपघात शनिवार २ मार्च मध्यरांत्री १ः ३० वाजेच्या सुमारास घडली आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक सी जी 084 आर 9535 हा वरोराकडून चिमूर कडे येत असताना त्याच वेळी रेती भरून असलेला ट्रॅक्टर नंबर MH 34 AP 2926 चिमूर वरून खडसंगी कडे जात असताना ट्रक – ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली.

त्यावेळी रेती ट्रॅक्टर मध्ये बसलेला मजूर जागीच मृत्यू झाला मृतकाचे नाव सचीन रामदास सोनवाने वय २५ हा बंदर येथील रहिवासी असून २ वर्षांपासून चिमूर येथील चिंटू पटेल यांच्या ट्रॅक्टरवर कामावर होता हा व्यक्ती घरातील कमवनारा,त्या माघे आई वडील दोन बहिणी असा परिवार आहे त्याच्या वडीलाची नेहमीच तब्येत बिघडत असते.मध्यरात्री घटनेची माहिती मिळताच पोलिस सहायक निरीक्षक चावरे,मानकर , अवधूत,पोलिस कर्मचारी यांनी धाव घेत पंचनामा करून दोन्ही चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“राष्ट्रीय महामार्गावरील काम देतात अपघाताला आमंत्रण”

चिमूर – वरोरा राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या सहा ते सात वर्षांपासून काम सुरू आहे तालुक्यातुन अनेक शासकीय कामात जिल्हाच्या ठिकाणी ये – जा करताना प्रवाशाना तारेवरची कसरत करावी लागते त्यामुळे मोठ मोठे अपघात होत आहेत या वर्षात अपघातांची मालिका सुरूच आहे. अपघात रोखण्यासाठी या ठिकाणी संबंधित विभागाने तसेच संबंधित कंत्राटदाराने लक्ष वेधून चिमूर – वरोरा जाणाऱ्या महामार्गावरील काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

राष्ट्रसंतांची संकल्पना रूजविण्यास शिबिर महत्त्वाचे – प्रतिकुमार टांगले

भिलेवाडा येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- स्पर्धेच्या युगात वावरत असतांना बहुतेक …

नागपूर जिल्ह्यासाठी गुरुवारी ऑरेंज अलर्ट

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर : -भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यामध्ये 9 मे रोजी वादळीवारा, वीज, गारपीट व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved