Breaking News

कीडझी चिमूरचे भावी लहानगे वैज्ञानिक “स्पेस ऑन व्हील्स” कार्यक्रमात सहभागी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-अवकाशाशी संबंधित विविध शैक्षणिक आणि मनोरंजक बाबी अनुभवण्याची संधी कीडझी कॉन्व्हेट चिमूरचे भावी लहानगे वैज्ञानिक मिळावी या उद्धेशाने लहानग्या वयात विद्यार्थ्यांना बाह्य अवकाशातील विशिष्टतेची ओळख करून देणे, त्यांचे ज्ञान वाढवणे आणि त्यांना अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी आपल्या देशातील भावी वैज्ञानिक यांना विज्ञान दिवसाच्या निमित्ताने स्थानिक ग्रामगीता महाविद्यालयात ,विज्ञान भारती आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान प्रदर्शनी स्पेस ऑन विल्स : अंतराळाची महायात्रा हा उपक्रमात कीडझी कॉन्व्हेट चिमुर येथील जुनियर आणि सिनीअर केजीच्या विद्यार्थी सह्भागी झालेत.


या वैज्ञानिक उपक्रमाद्वारे, विद्यार्थी अंतराळातील विलक्षण जगाशी गुंतले,वैज्ञानिक दृष्टी आणि त्यांची कुतुहलता तसेच तंत्रज्ञान व ग्रामीण समुदायांमधील दरी कमी करण्याच्या महत्त्वावरही या कार्यक्रमाने भर दिला. एकूणच, “स्पेस ऑन व्हील्स” कार्यक्रमाने सहभागी विद्यार्थ्यांवर कायमची छाप पडली, जिज्ञासा वाढवली आणि त्यांना कॉसमॉसचे चमत्कार शोधण्यासाठी प्रेरित केले. या कार्यासाठी कीडझी चिमूरच्या समन्वयक प्रियंका चांदेकर मॅडम , तेजस मिसार सर , वर्गशिक्षिका संस्कृती बोकारे , अर्चना धापटे, आणि भाग्यश्री भोपे मॅडम यांनी परिश्रम घेतले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

14 मे पर्यंत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी

नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने …

बालविवाह होत असल्यास त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन

पालकांसह इतरांनाही शिक्षेची तरतूद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 संपूर्ण राज्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved