Breaking News

चिमूर येथे विज्ञान प्रदर्शनी अंतराळाची महायात्रा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे २८ फेब्रुवारी २०२४ रोजी विज्ञान दिवसाच्या औचित्य साधून विज्ञान भारती आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रदर्शनी स्पेस ऑन विल्स : अंतराळाची महायात्रा हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी मंचावर अध्यक्ष म्हणुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमीर धमानी, उद्घाटक सेंट क्लरेट इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य, फादर रॉबिन पॉल, प्रमुख पाहुणे म्हणून  टी. आर. महाले केंद्रप्रमुख पंचायत समिती, चिमूर व  मनोज मडावी, तसेच या उपक्रमाचे समन्वयक प्रा. हुमेश्वर आनंदे उपस्थित होते.

या उपक्रमा अंतर्गत इस्रो या संस्थेद्वारे पाठविलेल्या बसमध्ये अंतराळ क्षेत्रात भारताची वाटचाल दाखविणारे आणि अंतराळ विषयी माहिती देणारे विविध प्रतिकृती आणि चित्र प्रदर्शनी पाहण्यासाठी परिसरातील १३ शाळांमधून जवळपास ३००० विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी सहभाग नोंदविला. या प्रदर्शनीमुळे विद्यार्थ्यांच्या मनात इस्रो करत असलेल्या कार्याची जाणीव आणि आपल्या देशातील विज्ञानाची प्रगती कशी झपाट्याने होत आहे याविषयी माहिती प्राप्त झाली. या उपक्रमाच्या अंतर्गत महाविद्यालयाद्वारे दोन गटात रांगोळी आणि भित्तीचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. रांगोळी स्पर्धेत एकूण १८ स्पर्धकांनी भाग घेतला. त्यामध्ये पहिला गट वर्ग ६ ते ८ मध्ये सेंट क्लरेट इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी सोनाक्षी यादव हिने प्रथम तर अनुजा खोपे हिने द्वितीय आणि नेहरू विद्यालय चिमूर येथील श्रुती बोडके हिने तृतीय स्थान प्राप्त केले. दुसरा गट हा वर्ग ९ व वर्ग ११ होता, या गटांमध्ये रांगोळी स्पर्धेत नेहरू महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी स्वान प्रथम, राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी हिना करवटे द्वितीय तर ग्रामगीता महाविद्यालयाची विद्यार्थिनी लक्ष्मी नरुले हिने तृतीय स्थान प्राप्त केले.

या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या भित्तीचित्र स्पर्धेमध्ये ३० विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये पहिल्या गटामध्ये सेंट क्लरेट इंग्लिश मीडियम स्कूल ची विद्यार्थिनी सोनाक्षी यादव हिने प्रथम स्थान, राजीव गांधी प्राथमिक विद्यालय चिमूर ची विद्यार्थिनी मीनाक्षी थुटे द्वितीय स्थान तर सेंट क्लरेट इंग्लिश मीडियम स्कूलची खनक कुंभारे हिने तृतीय स्थान प्राप्त केले. भित्तीचित्र या स्पर्धेच्या दुसऱ्या गटात नेहरू कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी पूर्वा बोडखे प्रथम, राष्ट्रसंत तुकडोजी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी हिना करवटे द्वितीय तर भुमिका देहारे हिने तृतीय स्थान प्राप्त केले.

स्पर्धेमधील सर्व विजेत्या स्पर्धकांना समारोपीय कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमीर धमानी, न्यू राष्ट्रीय शाळेचे मुख्याध्यापक  सुनील खोब्रागडे आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. हुमेश्वर आनंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र, रोख व पुस्तक या बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. बिजनकुमार शिल, प्रा. नागेश ढोरे, प्रा. संदीप मेश्राम, प्रा. रोहित चांदेकर, प्रा. प्रज्ञा खोब्रागडे प्रा. समीर भेलावे, प्रा. स्नेहाली बांबोडे प्रा. निकेश कुनघटकर तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि कर्मचारी वृद्ध यांनी मोलाचे सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

खडबडून जागे झाले एस. टी. प्रशासन नवीन बांधकाम त्वरित पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू

गेली सहा वर्षे रेंगाळलेले शेवगाव बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात “मी शेवगावकर” च्या दणक्यामुळे आगार …

देवटाकळी हिंगणगाव जोरापुर रस्त्याच्या कामासंदर्भात केंद्रीय ग्रामीण रस्ते विकास खात्याचे संतोष पवार कनिष्ठ अभियंता { पंतप्रधान ग्राम सडक योजना } अहमदनगर यांनी केला खुलासा

मातीच्या भागामधून जात असल्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा (Soil Stabilization अंतर्गत FDR) या तंत्र ज्ञानाचा वापर करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved