Breaking News

पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई- भगवानबाबा विद्यालय बालमटाकळी परिक्षा केंद्रावर धुडगुस घालणा-या आरोपींना तात्काळ अटक

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:- दिनांक- 29 मार्च 2024 शुक्रवार – शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील भगवानबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बालमटाकळी ता.शेवगाव या ठिकाणी दिनांक 26/03/2024 रोजी सकाळी 10/30 वाचे सुमारास भुगोल या विषयाचा इयत्ता 10 वीचा पेपर होता. सदर शाळेवर दहावीचा भुगोल या विषयाचा पेपर चालु होता. शाळेच्या गेटला कुलुप लावलेले असतांना देखील कुलुप तोडुन आतमध्ये प्रवेश करुन 15 ते 18 इसम यांनी परिक्षा केंद्रात शिक्षकांना व शिक्षिकेंना त्रास होवुन धाक निर्माण होईल असे वर्तन व कृती करुन हातातील लाकडी काठ्याचा धाक दाखवुन धक्काबुक्की करुन धमकी दिली. व शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणुन परीक्षा केंद्र संचालक यांचे तक्रारीवरुन शेवगाव पोस्टेला गु.र.नं.262/2024 भादवि कलम -353, 452, 332, 143, 146, 147, 148, 149, 504, 506 प्रमाने दिनांक 27/03/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

शेवगाव पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी तात्काळ सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी पथक तयार करुन सदर गुन्ह्यातील आरोपी नामे 1) ज्ञानेश्वर जनार्धन रक्टे रा.मुंगी, 2) दिपक अंकुश सपकाळ रा.बालमटाकळी, 3) अभिषेक भगवान गरड रा.बालमटाकळी ता.शेवगाव जि.अहमदनगर यांना गुन्हे दाखल होताच त्यांचा शेाध घेवुन दिनांक 27/03/2024 रोजी अटक केली. उर्वरित आरेापीची शेवगाव पोलीस शोध मोहीम राबवुन त्यांना अटक करुन पुढील कायदकशिर कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई ही मा.पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला सो अहमदनगर,मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरेअहमदनगर ,मा.उपविभागिय पोलीस अधिकारी श्री सुनिल पाटील सो उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.श्री दिगंबर भदाणे, सपोनि महेश माळी, पोहेकॉ परशुराम नाकाडे, पोहेकाँ सुधाकर दराडे, पोना उमेश गायकवाड, पोकॉ शाम गुंजाळ, पोकॉ बाप्पासाहेब धाकतोडे, पोकॉ संतोष वाघ, पोकॉ कृष्णा मोरे यांनी केली असुन पुढील तपास सपोनि महेश माळी हे करत आहेत.

*ताजा कलम*

*शेवगाव तालुक्यातील गायकवाड जळगाव येथील एका जुनिअर कॉलेजची ख्याती सुद्धा अशीच आहे सायन्स फॅकल्टी ला ऍडमिशन घ्या आणि डायरेक्ट परीक्षेला ऍडमिशन रेगुलर ना प्रॅक्टिकल न लेक्चर ओन्ली बोर्ड एक्झाम शेकडो ऍडमिशन बोगस चौकशी करणार कोण माध्यमिक शिक्षण खाते जो गाड झोपेत ???*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 2 : दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, …

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved