नगर परिषद भद्रावती तर्फे बक्षिस वितरण समारंभ सोहळा मोठ्या थाटात साजरा
जिल्हा प्रतिनिधी -सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- ‘स्वच्छता ही सेवा २०२४’ अभियान दि. १४ सप्टेंबर २०२४ ते दि. १ ऑक्टोंबर या पंधरवाडयात स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हे अभियान राबविण्यात आले.याच अभियानाचा एक भाग म्हणुन राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना त्यांच्या जयंती निमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी स्वच्छता हि सेवा व शालेय विदयार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये वर्ग ८ वी ते १० वी अ गटातुन प्रथम बक्षीस चिन्मया राजेंद्र पचारे सायकल, व्दितीय बक्षीस तिथी संजय मोघे गिटार, तृतीय बक्षीस तन्वी कावळे स्मार्ट वॉच, तसेच वर्ग ५ वी ते ७ वी ब गटातुन प्रथम बक्षीस विधी करमनकर सायकल, व्दितीय बक्षीस उत्कल वानखेडे बॅडमिंटन रॅकेट, तृतीय बक्षीस पहल पाटील स्मार्ट वॉच, व वर्ग १ ला ते ४ था क गटातुन प्रथम बक्षीस अवनी वतन लोने सायकल, व्दितीय बक्षीस आरोही कंदीकुरवार बॅडमिंटन रॅकेट, तृतीय बक्षीस दिव्या मंगल वाणी स्मार्ट वॉच, चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांना पारीतोषीक देण्यात आले.
व सोबतच पर्यावरणपुरक गौरी, गणपती विसर्जन कृत्रिम तलावत करणा-या नागरीकांची लक्की ड्रा विजेता म्हणुन प्रथम तिन बक्षिस पैठणी साडी व व्दितीय बक्षीस एकुण दहा वॉल वाच तर प्रोत्साहनपर १०० विजेत्यांना दोन डस्टबिन सेट देण्यात आले.या बक्षीस वितरण कार्याक्रमाचे अध्यक्ष स्थान आशुतोष सपकाळ संवर्ग विकास अधिकारी,तर आयोजक म्हणुन प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी ह्या उपस्थित होत्या. या मान्यवरांच्या हस्ते चित्रकला स्पर्धा विजेत्यांना व पर्यावरणपुरक गौरी गणपती विसर्जन कृत्रिम तलावात करणा-या नागरीकांचे लकी ड्रा मार्फत बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी विजयकुमार जांभुळकर यांनी केले. तर हे उपक्रम व कार्यक्रम घेण्याकरीता व यशस्वी करण्याकरीता आरोग्य विभाग आणि पाणीपुरवठा विभाग यांनी अथक परिश्रम घेतले आहे.