Breaking News

वरोरा भद्रावती विधानसभाचे अपक्ष उमेदवार मुकेश जिवतोडे यांना आदिवासी सगा समाज संघटनेचा जाहीर पाठिंबा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

वरोरा :– वरोरा-भद्रावती विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार मुकेश जिवतोडे यांना आदिवासी सगा समाज संघटनेचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे. या पाठिंब्यामुळे निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आदिवासी सगा समाज संघटनेने वरोऱ्यात आयोजित केलेल्या सभेत हा निर्णय घेतला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुकेश जिवतोडेच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा दिला असून बेरोजगारांसाठी रोजगार निर्मिती तसेच सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केलेल्या कामांची संघटनेने प्रशंसा केली.

संघटनेने त्यांच्या प्रमुख मागण्यांसह जिवतोडेंना पाठिंबा दर्शवला. यात आदिवासी समाजाच्या समस्या सोडवणे, बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, आणि पेणठाणा जागेचा प्रश्न मार्गी लावणे यांचा समावेश आहे.मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वामुळे त्यांना विविध समाजघटकांकडून पाठिंबा मिळत असून, या पाठिंब्यामुळे निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतदार जनजागृतीसाठी चार हजार विद्यार्थ्यांची मानवीय साखळी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृतीसाठी जिल्हा …

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या कार्यकारी अध्यक्षपदी न्या. भूषण गवई यांची नियुक्ती

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) च्या कार्यकारी अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved