शेअर मार्केटच्या नावाखाली ३३ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घालणा-या सखाराम नामदेव ढोरकुले या आरोपीस गुन्हा दाखल होताच काही तासातच पोलीसांनी सापळा लावुन केले शिताफीने जेरबंद
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की अवधुत विनायक केदार यांचे फिर्यादीवरुन गुरुकृपा ट्रेडिंग इनव्हेस्ट शेअर मार्केट ट्रेडींगच्या नावाखाली एकुण-३३ लाख ५० हजार रुपये फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करुन फसवणुक झाल्याचे फिर्यादीत नमुद केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं- ९९६/२०२४ भादवि कलम-४२०,४०६ सह एमपीआयडी ३,४ प्रमाणे दिनांक- १५/१२/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्यातील आरोपी सखाराम नामदेव ढोरकुले वय-२७ रा. बाभुळगाव ता. शेवगाव व त्याचा एक सहकारी राहणार आखेगाव रोड शेवगाव ता. शेवगाव वरील दोन्ही आरोपी यांचे विरुध्द गुन्हा दाखल होताच पळुन जाण्याचे तयारीत असतांना शेवगांव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवुन पोलीस पथक तयार करुन आरोपी क्र. १ याला शेवगाव- पैठण रोडने जात असतांना मोटार सायकल वर पाठलाग करुन पकडण्यात आले आहे तसेच आरोपी क्र.२ याला आखेगाव रोड शेवगाव येथुन ताब्यात घेवुन त्यांना शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणुन वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन त्यांना मा. जिल्हा सत्र न्यायालय अहिल्यानगर येथे हजर केले असता त्यांना ८ दिवस पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
कथित आरोपी विरुध्द इतर कोणीही फसवले गेलेले अगर जनतेची फसवणुक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोस्टेशन ला बिनधास्तपणे संपर्क साधावा असे याव्दारे आवाहन करण्यात येत आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला साहेब अहिल्यानगर,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे अहिल्यानगर,उपविभागिय पोलीस अधिकारी सुनिल पाटील उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.समाधान नागरे,पो.स.ई.प्रविण महाले,पो.हे.काँ.चंद्रकांत कुसारे,पो.काँ.शाम गुंजाळ,पो.कों.’संतोष वाघ,पो.काँ. राहुल खेडकर,पो.कों.फलके,पो.काँ.धनेश्वर पालवे,पो.कों. प्रशांत आंधळे, पो.कों. देविदास तांदळे तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पो.काँ. राहुल गुंडु यांनी केली असुन वरिल गुन्ह्यांचा तपास पो.स.ई. प्रविण महाले हे करत आहेत.
*ताजा कलम*
*शेवगांव तालुक्यात हजारो लोकांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक झालेली असताना फसवले गेलेले गुतंवणूकदार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत हा एक संशोधनाचा विषय आहे त्यात काही फरार भामटे बिग बुल्स गुतवणूकदारांनाचं आरोपी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा तालुक्यात आहे याला आळा कोण घालणार ??? काही भामटे कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल असताना सोशल मीडियावरुन गुतंवणूकदारांना पत्रकारांना राजरोस धमक्या देत आहेत शेवगांवचे कर्तव्यदक्ष पोलीस लवकरच त्यांच्याही मुसक्या आवळतील अशी अपेक्षा फसवणूक झालेल्या गुतंवणूकदारांना आहे*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*