Breaking News

नागपूर जिल्हयात रेमडीसीव्हर औषधीचा तुटवडा पडणार नाही : जिल्हाधिकारी

औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना पुरवठा निश्चित करण्याचे दिले निर्देश

नागपूर दि १९ : नागपूर जिल्ह्यातील शासकीय व खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना आजारासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या रेमडीसीव्हर या औषधांचा तुटवडा पडता कामा नये, असे निर्देश आज जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी पुरवठादार कंपन्यांना दिले आहेत. हॉस्पिटलने अशा पद्धतीचा तुटवडा असल्यास प्रशासनाची मदत घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

नागपुर मधील काही खासगी हॉस्पिटलनी रेमडीसीव्हर औषधांचा तुटवडा जाणवत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिले होते. जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अन्न व औषधी प्रशासन विभागाचे उपायुक्त गडेकर यांनी ही बाब लक्षात आल्यानंतर रेमडीसीव्हर पुरवठा करणाऱ्या सिप्ला, हेटेरो, मायलन, गायडस या कंपन्यांच्या नागपूर येथील स्थानिक प्रतिनिधींना याबाबत अवगत केले.

अन्न व औषध प्रशासन विभागाने कोरोना संदर्भातील कोणत्याही औषधा बाबतची कृत्रिम टंचाई जाणवत कामा नये. तसेच नागपूर जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये आवश्यक असणाऱ्या रेमडीसीव्हर औषधांचा नियमित व सुलभ पुरवठा कोवीड रूग्णालयांना प्राधान्याने व्हावा, असे या पुरवठादारांना निर्देशित केले आहे.

औषधांचा तुटवडा असल्याबाबत कोरोना बाधित यांच्या नातेवाईकांना काही ठिकाणी सांगण्यात येत आहे. अशा पद्धतीने औषधांचा तुटवडयाबाबत नागरिकांमध्ये गोंधळ उडवून देऊ नये, अशी सूचनाही जिल्हा प्रशासनाने केली आहे. रुग्ण संख्या वाढत असताना या पद्धतीच्या औषधांचा तुटवडा जाणवणार नाही, यासाठी प्रशासन लक्ष ठेवून आहे.

यापूर्वी ऑक्सिजनच्या पुरवठयाबाबतही अशाच पद्धतीच्या अफवा उडत होत्या. मात्र नागपूर येथील शासकीय व खासगी रुग्णालयांसाठी आवश्यक असणारा पुरेसा ऑक्सिजनचा साठा जिल्हयात उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भातील गठित समिती ऑक्सिजनच्या तुटवड्याचा दररोज आढावा घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ऑक्सिजन पुरवठा संदर्भात अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी श्रीकांत फडके हे नोडल अधिकारी असून तुटवडा संदर्भात O712-2562668 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत नागपूरला प्रथम पुरस्कार

  मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनपा आयुक्तांना पुरस्कार प्रदान नागपूर, ता. २० : राज्यातील नागरी स्थानिक …

दहा वर्षापूर्वीच्या आधारकार्डचे अद्यावतीकरण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन  

नागपूर, दि.20 : दहा वर्षांपूर्वीच्या आधार कार्डचे अद्यापही अद्यावतीकरण केले नसलेल्या नागरिकांनी तात्काळ ही प्रक्रिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved