Breaking News

प्रभाग १८ सिरसपेठ मधील लिकेज गटारीमुळे विहीरीतील पाणी प्रदूषित

नागपुर :- मध्य नागपूर मधील प्रभाग १८, सिरसपेठ मधील डॉ. वानस्कर यांच्या घरा समोरील लिकेज गटारीमुळे विहिरीला गटारीचे दूषित पाणी झिरपून परिसरात मोठ्या प्रमाणात रोगाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याच प्रमाणे नित्यानंद बाबा मंदिर समोर श्री. तलमले यांच्या घरी सुद्धा याच प्रकारे गटारीचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्याला झिरपत आहे.

या गंभीर समस्या मुळे परिसरात रोगराईचे वातावरण निर्माण झाले आहे व नागरिकांनमध्ये अत्यंत रोष आहे, ही जनसमस्या सोडविण्यासाठी आज आम आदमी पार्टी मध्य नागपूर तर्फे मनपा सहआयुक्त गांधीबाग झोन ला निवेदन देण्यात आले व तातडीने या समस्येची पाहणी करून संपूर्ण समस्या सोडूऊन देण्याची मागणी करण्यात आली,अन्यथा आम आदमी पार्टी नागपूर तर्फे महानगर पालिका विरूद्ध तीव्र आंदोलन कण्याचा ईशारा देण्यात आला.

यावेळी आम आदमी पार्टीचे विदर्भ युवा आघाडी संयोजक पियुष आकरे, नागपूर शहर युवा आघाडी अध्यक्ष गिरीष तितरमारे, मध्य नागपूर अध्यक्ष नीलेश गहलोत, सहित समस्त आप मध्य नागपूर विधानसभा कार्यकर्ता उपस्थिती होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

नागपूर दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved