जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- चिमूर विधानसभेच्या चिमूर,नागभीड, ब्रम्हपुरी तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही, वरोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवडीखालील धान,सोयाबीन, तुवर सर्व पिकांचे मावा तुडतुडा व अन्य रोगांच्या प्रादुर्भावात पूर्णतः नष्ट झाल्याचे आमदार भांगडीया यांच्या चिमूर विधानसभा क्षेत्रात शेती बांधाच्या दिनांक ३०,३१अक्टोंबर २०२० च्या दौऱ्यात दिसले.
अलीकडे कोरोना १९ स्थितीत शेतीशिवाय पर्याय नसतांना परिसरात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मोलमजुरी गहाण व कर्जाने धान सोयाबीन,तुवर पिकांचे महागडे बीज घेऊन लागवड केली आहे.धान पिकांची सर्वसाधारण वाढ व उत्पादन कठीण स्थितीत असतांना माहे ऑगस्ट २० मधे सततधार पाउस त्यांनतर वैनगंगा नदीचा महापूर प्रकोप व माहे अक्टोंबर मधील मान्सूनच्या परतीच्या पावसाचा मार आणी वातावरणातील बदल अशा अनेक माराने संपूर्ण पिकांवर परिणाम होऊन मावा तुडतुडा ,लष्करी बोंडअळी व अन्य रोगांच्या प्रदूर्भावात वाचविण्यासाठी महागडी फवारणी उपयोगात आली नाही त्यामुळे केमिकलयुक्त चारा जनावरांनाही देता येणार नाही अशी स्थिती आहे.
मावा तुडतुडा रोगांचा प्रादुर्भाव वाढताना चंद्रपूर जिल्हास्तरीय अधिकऱ्यांसह चर्चेत संबंधित महसूल व कृषी विभागास प्रत्यक्ष सुचना/आदेश अद्याप प्राप्त नसल्याने धान सोयाबीन तुवर,उत्पादक शेतकरी हवालदील असून चंद्रपूर जिल्ह्यात नुकसानग्रस्त पिकांचा आढावा प्रलंबित असल्याने दिवाळीपूर्वी मदत मिळने शक्य नाही असे चित्र दिसते.
पूर्वविदर्भातील शेती उत्पादन अभावी चिंताग्रस्त शेतकरी दिवाळीत आत्महत्येचा दिवा लावण्याची भिती आहे त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर विधानसभा क्षेत्राच्या चिमूर नागभीड, ब्रम्हपुरी व सिंदेवाही वरोरा तालुक्यात धान, सोयाबीन, तुवर व अन्य पिके मावा तुडतुडा रोगाच्या प्रादुर्भावात पूर्णतः नष्ट होवूनही सर्वेक्षनासह नुकसान शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्यासाठी उपाययोजना होण्यासाठी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार भांगडीया यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दुसरे स्मरण पत्र देऊन मदतीची मागणी केली आहे.