
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे आदेश
नागपूर, ता. १० : लग्न समारंभामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने बँड पथकासाठीही मनपातर्फे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार, बँड पथकामध्ये जास्तीत जास्त २० व्यक्तींचा समावेश असावा. लग्न समारंभात ५० व्यक्तींना परवानगी देण्यात आली असून यामध्ये बँड पथकातील सदस्यांची संख्या गृहित धरण्यात येईल.
सामाजिक अंतर राखून बँड वाजविणे बंधनकारक राहिल. सायंकाळी ९ वाजतापर्यंतच बँड वाजविण्याची मुभा असेल. बँड पथकाच्या मालकाने पथकातील सर्व सदस्यांचे थर्मल स्कॅनिंग करून नोंद घेणे बंधनकारक आहे. बँड संदर्भातील सर्व साहित्याचे नियमित निर्जंतुकीकरण करून घेणे बंधनकारक आहे. पथकातील सर्व व्यक्तींनी चेहऱ्यावर मास्क लावणे, सॅनिटाजरचा वापर करणे बंधनकारक राहिल. पथकातील एखाद्या व्यक्तीस ताप किंवा इतर कोव्हिड सदृष्य लक्षणे आढळल्रास त्याचा पथकात समावेश करू नये. कोव्हिड-१९ अंतर्गत शासनाद्वारे तसेच मनपा आयुक्तांद्वारे वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहिल.