
नागपुर :- विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी अनेक दिग्गज उमेद्वार रिंगणात असुन या निवडणुकीत विदर्भवादी पक्षानी सुद्धा उडी मारली आहे. यामध्ये विदर्भाचे गाढे अभ्यासक, विदर्भवादी नितीन रोंघे यांना उमेद्वारी जाहिर करण्यात आलेली आहे. याबद्दल नितीन रोंघे सह सर्व विदर्भवादी नेत्यांनी पत्रपरिषद घेवुन माहिती दिली.
नितीन रोंघे यांच्या उमेद्वारीला विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ माझा पार्टी, बळीराजा पार्टी, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, केंद्रीय जनविकास पार्टी यांनी आपला पाठींबा दिलेला असुन विदर्भवादी संघटनांनी सुद्धा आपला पाठींबा दिलेला आहे. नितीन रोंघे हे विदर्भाचा विकास, येथील बेरोजगारी, शिक्षित युवकांचे पलायन, विदर्भातील विविध प्रश्न, व स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्यांवर ही निवडणुक लढवत असल्याचे नितीन रोंघे म्हणाले.
नागपुर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असून आता या मतदारसंघातुन दिग्गज उमेद्वार रिंगणात असल्याने सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे आहे. भाजपने महापौर संदीप जोशींना उमेद्वारी दिली तर कांग्रेसने अभीजीत वंजारी यांना उमेद्वारी जाहिर केलेली आहे. तिन्ही उमेद्वारांमध्ये जोरदार सामना रंगण्याची शक्यता आहे.
पत्रपरिषदेला विदर्भवादी चंद्रकांतजी वानखेडे, विदर्भ माझाचे संस्थापक अध्यक्ष राजकुमारजी तिरपुडे, मुकेशजी समर्थ, अधिवक्ता निरज खांदेवाले, प्रमोद पांडे, बळीराजा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र धावडे, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी चे राजेश काकडे, केंद्रीय जनविकास पार्टीचे डॉ अरुप मुखर्जी, अरुणाताई सबाने, नरेंद्र पालांदुरकर, रामभाऊ आखरे, दिलीप नरवडिया, सुधाताई पावडे, डॉ नेहा पालांदुरकर, समीर पाटणे, आशिष डायगव्हाणे, स्वपन्नील समर्थ, बाबा राठोड, निरज फुलझेले, निखील भुते आदि उपस्थित होते.