Breaking News

जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेत बदल

नागपूर दि.18 : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. यात नागपूर जिल्हयातील 130 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. ग्रामपंचायतीमधील मागास प्रवर्गातील जागांवर निवडणूक लढविण्यासस इच्छुक असलेल्या व त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 1 ऑगस्ट पासून जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावयाच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे, असे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर यांनी कळविले आहे.

जात वैधता प्रमाणपत्रांसाठी आपले अर्ज www.bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर परिपूर्ण भरल्यावर आवश्यक दस्ताऐवज अपलोड करुन ऑनलाईन सबमीट करावे. त्यानंतर त्याची प्रिंट घेवून पुढीलप्रमाणेच विहित कार्यपध्दतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मार्फत समिती कार्यालयाकडे प्रत्यक्ष अर्ज सादर करावेत. जुन्या पध्दतीने हस्तलिखील स्वरुपातील अर्ज समिती कार्यालयात स्विकारले जाणार नाही. संबंधितांनी याची नोंद घ्यावी.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

नागपूर दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved