= भय्यूजी महाराज विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनीचा सहभाग =
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- पोलिस स्टेशन चिमूरच्या वतीने व श्री संत भय्यूजी महाराज उच्च माध्यमिक शाळा यांचे सहकार्यातुन पोलिस स्टेशन चिमूर ते हजारे पेट्रोल पंप चौका पर्यंत वाहतुकीचे नियमासंदर्भाने नागरिकामधे जनजागृती करन्याकरिता रैलीचे आयोजन करण्यात आले होते, दिवसेंदिवस बाढ़ होत असलेल्या रस्ते अपघातावर प्रतिबंध व्हावा व अपघातातील मृतुचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने पोलिस निरीक्षण मनोज गभने यांचे संकल्पनेतून भय्यूजी महाराज विद्यालय चिमूरच्या विधार्थयाना सहभागी करुण वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या नागरीकाकरीता घोषवाक्य देत रैली काढण्यात आली,
रैली मध्ये पोलिस कर्मचारी सहित, शिक्षक व 50 विधार्थयानी सहभाग नोंदविला, हजारे पेट्रोल पंप चौकामधे विद्यार्थ्यांच्या हस्ते पोलिस स्टेशन चिमूरच्या वतीने नागरिकांना वाहतूक नियम पाळनयाबाबत करण्यात आलेल्या आव्हानाचे पाम्पलेट वाटप करण्यात आले,
सदर रैली करीता श्री संत भय्यूजी महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक एस बी पीसे, आर के पंधरे, एम एच शिवरकर, सौ, व्ही, बी, गजभिए, त्याचप्रमाणे चिमूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मनोज गभने, पोलिस उपनिरीक्षक अलीम शेख, सहायक फौजदार विलास सोनुने, पोलिस नाईक कैलास आलम, पोलिस अमलदार राहुल चांदेकर, तसेच वाहतूक शाखेचे पोलिस अमलदार दिलीप वाळवे, सुखराज यादव, रामेश्वर डोईफोडे, नितेश गुड़धे यानी उपक्रमात सहभाग घेतला,