जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- आज दिनांक 22 जानेवारी 2022 ला मौजा रेंगाबोडी येथे कोरोना नियमाचे पालन करून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती चिमूर यांचे अंतर्गत मंजुळामाता ग्रामसंघ रेंगाबोडी कार्यालयाचे उदघाटन व सर्वसाधारण सभा प्रसंगी प्रभाग समन्वयक हेमचंद बोरकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की महिलांनी सर्व क्षेत्रात भरारी घ्यावी तसेच उद्योजक बनावे.
ग्रामपंचायत रेंगाबोडी सरपंच वर्षा राऊत यांचे हस्ते फित कापून मंजूळामाता ग्रामसंघ कार्यालयाचे उदघाटण करण्यात आले सदर कार्यक्रमा साठी प्रमुख अतिथी म्हणून चंद्रशेखर पाटील सचिव ग्राम पंचायत कार्यालय रेंगाबोडी, देवराव लाटकर तंटामुक्ती समिती अध्यक्ष रेंगाबोडी , इंदु मेश्राम अध्यक्ष मंजुळामाता ग्रामसंघ रेंगाबोडी , वंदना गुळधे सचिव मंजुळामाता ग्रामसंघ रेंगाबोडी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी CRP पुष्पा थुटे रेंगाबोडी, काजल पाटील खडसंगी, ममता सरपाते मुरपार, मुला कोयचाडे जामणी तसेच गावातील सर्व समुहाच्या सदस्य यांनी सहकार्य केलेत.
सदर कार्यक्रमचे संचालन सुरेखा वाकडे आशा वर्कर रेंगाबोडी यांनी केले तर उपस्थितांचे आभार दीपाली बारस्कर यांनी मानले.