शेतकऱ्यांनी आत्मदहन आंदोलन घेतले मागे
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-चिमूर तालुक्यातील आखरी टोकावर असलेल्या माखोना पांजरेपार रीट सिवारातील शेतकऱ्यानी शेतात जाण्याच्या रस्त्याच्या संदर्भात आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यानी भेट दिली असता शेतकऱ्यानी आंदोलन मागे घेतले आहे.
दिनांक 25 जुलाई रोजी शेतात जाण्याच्या रस्त्याच्या संदर्भात आंदोलनाला विषारी किटाणु नाशक औषधी घेऊन शेकडो शेतकरी आंदोलनाला बसले होते, माखोना ते पांजरेपार हा 3 किलोमीटरचा मार्ग असून याच मार्गावरुन शेतकरी शेत मंजूर जाने येणे करीत आहेत,
मागील 3 वर्षापासून हा रस्ता खडीकरण व्हावा या मागणी साठी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधि यांना वारंवार निवेदन देत होते, विविध संघटनेच्या माध्यमातून सुध्दा निवेदन देण्यात आले होते,
पण आश्वासन शिवाय शेतकऱ्यांना हाती काहीच मिळत नव्हते,रस्ता चिखलमय झाल्यामुळे शेतातील रोवने आणि शेतीचे कामे थांबले होते, या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यानी आज आत्मदहनाचा इशारा आजच प्रशासनाना दिला होता, शेतकरी आंदोलनाची बातमी चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांना माहिती होताच माखोना येथे आंदोलन स्थळी जाऊन भेट दिली आणि शेतकऱ्यांन सोबत जाऊन संपूर्ण चिखलमय झालेल्या रोडची पाहणी केली,
व शेतकरी बांधवांना सोबत घेऊन रस्त्याच्या संदर्भात चर्चा करुन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, शेतकऱ्यांनी तातपुरते आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला, प्रकाश संकपाळ यानी सावरी ग्राम पंचायत तहसीलदार प्राजक्ता बुरांडे, उपविभागीय अभियंता समीर उपगंलावार, मंडल अधिकारी, तलाठी, ग्राम सेवक सरपंच व गावकरी यांचेशी चर्चा करून संबंधित विभागाने ताबड़तोड़ काम मार्गी लावण्या संदर्भात आदेश दिले आहे.