जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-नुकत्याच नागपुर येथे झालेल्या जी टोकु काई कराटे स्पर्धेत चिमूर व नेरीच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. स्पर्धेचे आयोजन शिहान विनोद गुप्ता आणि शिहान शाम भोवते यांनी केले होते.
या स्पर्धे मध्ये अनेक जिल्ह्यातील खेडाळुंनी भाग घेतला होता यामध्ये चिमूर मधील शॉओलीन कुंग – फु इंटरनॅशनल च्या सहा विद्यार्थ्यांनी तर नेरी मधिल आठ विद्यार्थ्यांनी ग्रॅन्ड मॉस्टर शिफु डॉ. सुशांत के. इन्दोरकर यांच्या मार्गदर्शनात सहभाग घेतला व सर्व विद्यार्थ्यांनी फाईट व काता या प्रकारात यश संपादन करून पदक पटकवीले यामध्ये चिमूर क्लास चे असिस्टन इन्ट्रक्टर सुनिल सातपैसे यांनी फाईट प्रकारात रजत तर काता प्रकारात सुवर्ण , समिर पठाण काश्य – रजत , कनिष्क पाटील रजत – काश्य , सागर पिसे रजत – काश्य , श्रध्दा साटोने सुवर्ण – रजत , कामक्शी राऊत रजत – काश्य अशी पदके प्राप्त करुण चिमुर च्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले व चिमुर शहराचे नाव लैकीक केले तर नेरी येथील लक्की नगराळे यांनी सुवर्ण – काश्य , हर्षल फाये सुवर्ण – काश्य , दर्शील वरखडे सुर्वन – काश्य , मानसी वाढंरे सुवर्ण – काश्य , वेदांत कोठेकर रजत – काश्य , विनय गोस्वामी काश्य – रजत , अथर्व हटकर सुवर्ण – काश्य अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येकी दोन पदकांची कमाई केली .तसेच मोसेस कप २०२२ – नॅशनल ओपन कराटे चॉम्पियनशीप भद्रावती येथे झालेल्या स्पर्धे मध्ये शॉओलीन कुंग – फु इंटरनॅशनल नेरी च्या इन्ट्रक्टर कु.समिक्षा इन्दोरकर यांनी फाईट प्रकारात सुवर्ण पदक पटकवीले विद्यार्थ्यांचे विदर्भ इन्स्ट्रक्टर सिफु पिपलायन आस्टनकार यांनी अभिनंदन केले तर विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय चिमुर ब्रांच चे इन्स्ट्रक्टर सुदर्शन बावणे , अशोक आवळे व आपल्या आई वडलांना दिले. या त्यांच्या यशामुळे विद्यार्थ्यांचे चिमुर शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.