जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नवेगाव चक जंगलामध्ये एका ३६ वर्षीय युवकाला वाघाने हल्ला करून ठार केले असता गाव परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. एकीकडे मानव वन्यजीव संघर्ष कुठेतरी थांबावा यासाठी वनविभागात अनेक ग्रामीण भागात जनजागृती करीत आहे तर दुसरीकडे मानव-वन्यजीव संघर्ष वाढताना दिसत आहे.
आज दि. १५/०६/२०२३ ला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मृतक नामे रघुनाथ नारायण गुरनुले. रा. नवेगाव लोन तहसील सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर वय ३६ यांना नवेगाव चक जंगल परिसरात वाघाने ठार केले.
या घटनेची माहिती मिळताच तात्काळ वनविभागाचे अधिकारी हटवार आणि त्यांची टीम तसेच माहिती प्राप्त झाल्यानंतर सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पी.एस.आय.महाले व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असता मृतदेह उर्वरित तपासणीकरिता सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.