Breaking News

वरोरा तालुक्यात चारगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेचे उद्घाटन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

वरोरा:-वरोरा तालुक्यात चारगाव येथे जय भवानी जय शिवाजी घोषणा करत रॅली काढून पूर्ण जल्लोष मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करुन, उदघाटक म्हणून लाभलेले शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे यांच्या हस्ते व युवासेना तालुका प्रमुख वरोरा ओंकार लोडे यांच्या नेतृत्वात शिवसेना शाखेचे उदघाट्न करण्यात आले.

त्यावेळी प्रमुख उपस्थिती युवासेना जिल्हाप्रमुख मनिष जेठानी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख रमेश मेश्राम, शिवसेना उपतालुका प्रमुख राजु राऊत, जेष्ठ शिवसैनिक अतुल नांदे शिवसेना विधानसभा मिडिया प्रमुख गणेश चिडे, युवासेना उपतालुका प्रमुख अक्षय झिले, युवासेना विभाग प्रमुख रवी वाटकर, विभाग प्रमुख दिलीप बोधाने, उपविभाग प्रमुख कुणाल बुऱ्हाण, कपिल धकाते, रोशन नन्नावरे, निखिल कुडमेथे,समस्त पदाधिकारी,शिवसैनिक,युवासेना,उपस्थित होते.

त्यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील बेरोजगारांसाठी बेरोजगार संपर्क अभियान राबविण्यात येत आहे त्यावेळी मुकेश जिवतोडे यांनी असे बेरोजगारांना सूचित केले कुणी सुशिक्षित बेरोजगार असेल त्यांनी शिवसेना जिल्हा कार्यालय वरोरा येथे आपले कागदपत्रे सादर करावे.
तसेच शिवसेना ( उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे ) यांच्या माध्यमातुन सामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करील असे व्यक्तव शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी जनतेला केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्हाधिका-यांनी घेतला भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा आढावा

तक्रारी असल्यास संबंधित विभाग किंवा समितीला कळविण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भ्रष्टाचार निर्मुलनासंदर्भात जिल्हाधिकारी विनय …

लेखिका डॉ. मेधा कांबळे लिखित “आठवणीतील शेवगाव” या पुस्तकाने खोवला मानाचा तुरा

*”आठवणीतील शेवगाव” या डॉ. मेधा कांबळे लिखित पुस्तकाचे 18 मे शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved