Breaking News

आठवा मैल मधून चोरीला गेलेली दुचाकी, रविनगर ला सापडली

पेट्रोल संपल्याने, सापडली दुचाकी

प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी

दवलामेटी प्र:-वाडी पोलीस स्टेशनं हद्दीतील, 29 नोव्हेंबर चा रात्री घरा समोरून चोरीला गेलेली दुचाकी पॅशन प्रो पेट्रोल संपल्या मुळे रविनगर इथे 11 डिसेंबर ला अखेर सापडली. आठवा मैल, पालकर नगर येथील रहिवाशी रुपेश कळमकर यांची दुचाकी क्रमांक एम एच 40 ए एच 4292 29 नोव्हेंबर ला रात्री घरासमोरून चोरीला गेलेली दुचाकी रविनगर ला फुटबॉल ग्राऊंड जवळ सापडली.

चार चाकी चालक रणजित सॅल्यूटकर यांनी गाडीचा क्रमांक ऑनलाईन शोध घेऊन गाडी मालकाचा मोठा भाऊ अंशुल कळमकर ला फोन वर दुचाकी उभी असलेल्या जागेवर बोलावून घेतलं. प्राथमिक पाहणी केली असता वहना वरील नंबर खोड तोड केल्याचे दिसून आले तसेच हॅण्डल लॉक तोडलेला होता. गाडीतला पेट्रोल पूर्ण पणे संपला होता. पेट्रोल लॉक बंद असल्याने चोराला पेट्रोल भरता आला नसल्याने गाडी तिथेच उभी करून पळून गेला असा अंदाज प्राथमिक पाहणी वरून येतो असे गाडीचे मालक रुपेश कळमकर यांनी सांगितले. पुढील सविस्तर चौकशी वाडी पोलीस करीत आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

नियोजन भवन येथे अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी …

F.D.R. मुदत संपून सहा महिने झाले तरी पैसे देत नाही म्हणून महिलेने दिला भर चौकात चोप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved