Breaking News

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भर उन्हाळ्यात दिवसाला पाणी ~ सूर्य कोणत्या दिशेने उगवला?

प्रत्येक उन्हाळ्यामध्ये अशीच निवडणूक लागू दे-नागरीक

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की सालाबाद प्रमाणे शेवगांव शहराच्या उन्हाळ्यातील पाणीपुरवठा मध्ये कमालीची घट होत असते परंतु होऊ घातलेली लोकसभा निवडणूक शेवगाव शहरवासींच्या पथ्यावर पडल्याचे दिसत आहे सुमारे 30 वर्षां पूर्वीची पाणी योजना सुरळीत चालू झाली हिवाळ्यात 13 /14 दिवसाला पाणी देणारे शेवगाव नगरपरिषद प्रशासन अचानक उन्हाळ्यामध्ये सहा ते सात दिवसाला पाणी देऊ लागल्याने शेवगाव चे सर्व सामान्य नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत *प्रत्येक उन्हाळ्यामध्ये अशीच निवडणूक लागू दे* म्हणजे शेवगावकरांना नेहमीच पाणी मिळत जाईल अशी आशा काही माय माऊली खाजगीत बोलत आहेत.नवीन रखडलेलली पाणी योजना तिचा भामटा कॉन्ट्रॅक्टर तालुक्याची लोकप्रतिनिधी जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी यांच्या अचानक उफाळून आलेले प्रेम यामुळे शेवगावकर सद्गतीत झाला आहे. निवडणुका झाल्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या ऋतू कोणताही असो उन्हाळा हिवाळा पावसाळा पाणीटंचाई शेवगावकरांच्या पाचवीला पुजलेली आहे.

परंतु आता एका मागे एक होऊ घातलेले इलेक्शन लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद *यामुळे झक मारून प्रशासनाला आणि राजकारणी लोकांना शेवगाव शहराची काळजी घ्यावी लागणार आहे* मत मागायला दारात गेल्यानंतर मतदार पहिला प्रश्न विचारतो *शेवगावकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न पिण्याचे पाणी तालुक्यातील रस्ते राज्य महामार्ग कोलमडलेली वीज वितरण व्यवस्था बाह्यवळण रस्ता शहरातील अतिक्रमण यांचं काय त्यामुळे राजकारणी आणि त्यांचे चेले चपाटे यांची चांगलीच तारांबळ उडत आहे “भीक { मत } नको पण { प्रश्न रुपी } कुत्रा आवर” अशी म्हणण्याची वेळ या लोकांवर आली आहे* ज्यांनी गेली कित्येक वर्षे शेवगाव शहराचे प्रश्न प्रलंबित ठेवले त्यांना लोक मतपेटीतून जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत ???.

*ताजा कलम*

*शेवगाव शहर जपानी प्रश्न जाणून बुजून कोणी प्रलंबित ठेवला कोट्यावधी रुपये येऊनही पाणी योजना कोणी रखडवली ??? नियुक्त ठेकेदार कोणाचे गोंधळी ते पाणी पितो गेल्या वर्षभरापासून तो पत्र पत्र का खेळतोय ??? नगरपरिषदेमध्ये प्रशासक राज असल्यामुळे व जाब विचारायला सभागृहन असल्यामुळे व शेवगाव नगर परिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्यामुळे सगळा कारभार “आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातय” असा झाला आहे*

{ क्रमशः }

*Avinash Deshmukh Shevgaon*
*Samajik Karykarta / Patrkar*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

नियोजन भवन येथे अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी …

F.D.R. मुदत संपून सहा महिने झाले तरी पैसे देत नाही म्हणून महिलेने दिला भर चौकात चोप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved